Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पंचविशीत केस पिकले म्हणून डाय काय करता? आवळा कढीपत्त्याचा उपाय-केस होतील काळेभोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 16:24 IST

How To Make Natural Hair Dye At Home : घरगुती उपाय तुम्हाला कोणच्याही साईड इफेक्ट्सशिवाय, कोणताही जास्तीचा खर्च न करता चांगला रिजल्ट देऊ शकतात.

कमी वयात केस पिकणं ही खूपच कॉमन समस्या झाली आहे. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे लाईफस्टाईल, ताण-तणाव आणि प्रदूषण, केमिकल्सयुक्त उत्पादनांच्या जास्त वापरामुळे केसांचे नुकसान होते. ज्यामुळे केस लवकर पांढरे होऊ लागतात. जर तुम्ही केमिकल्सयुक्त उत्पादनं केसांवर सतत लावत असाल तर ते थांबवून घरगुती उपाय करण्याकडे लक्ष द्यायला हवं. (How To Make Natural Hair Dye With Amla And Curry Leaves At Home)

घरगुती उपाय तुम्हाला कोणच्याही साईड इफेक्ट्सशिवाय, कोणताही जास्तीचा खर्च न करता चांगला रिजल्ट देऊ शकतात. आवळा आणि कढीपत्त्याचा हा उपाय तुमचे केस काळेभोर करण्यास मदत करेल. ज्यामुळे केसांना फक्त पोषण मिळणार नाही तर केस मुळांपासून मजबूत  होतील. (How To Make Natural Hair Dye Easy Steps)

आवळा आणि कढीपत्त्याचा हेअर डाय तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

 २ चमचे आवळा पावडर, २ चमचे कढीपत्ता पावडर, १ कप पाणी,  १ चमचा कॉफी किंवा चहा पावडर, १ ते २ चमचे लिंबाचा रस.

 आवळा आणि कढीपत्त्याचा हेअर डाय कसा करायचा?

सगळ्यात आधी १ लोखंडाची कढईत घ्या. त्यात आवळा पावडर आणि कढीपत्ता घालून हलकं काळं होईपर्यंत भाजून घ्या. नंतर यात पाणी घाला नंतर कॉफी पावडर किंवा चहा पावडर मिसळा. व्यवस्थित शिजवून या मिश्रणाची पेस्ट तयार करून घ्या. शेवटी यात लिंबाचा रस मिसळा आणि हे मिश्रण रात्रभर लोखंडाच्या कढईत तसंच राहू द्या.

केसांना  ही पेस्ट कशी लावाल

सकाळी उठल्यानंतर केसांच्या मुळांना ही पेस्ट व्यवस्थित लावा. १ ते २ तास केसांना तसंच लावलेलं राहू द्या. त्यानंतर साधं पाणी किंवा माईल्ड शॅम्पूनं केस धुवून घ्या. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून एकदा ही पेस्ट लावा.

या घरगुती डायचे फायदे

आवळ्यात व्हिटामीन सी आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे केसांचे पिग्मेंटेशन चांगले होण्यास मदत होते. ज्यामुळे केस हळूहळू काळे होऊ लागतात. कढीपत्ता केसांना मुळापासून पोषण  देतो. ज्यामुळे हेअर फॉल कमी होतो. केस पांढरे होण्याची प्रक्रियाही संथ होते. केसांना नैसर्गिक चमक येते. तंसच नियमित हा उपाय केल्यानं केस दाट दिसतात. यातील पोषक तत्व खाजेच्या समस्येवर गुणकारी ठरतात.

आठवड्यातून २ वेळा नारळाचं तेल लावा. जास्त केमिकलयुक्त शॅम्पू किंवा हेअर प्रोडक्ट्सचा वापर करू नका, हेल्दी डाएट घ्या, प्रोटीन आणि आयर्नने परिपूर्ण असा आहार घ्या. जास्त स्ट्रेस घेऊ नका. कारण याचा परिणाम केसांवर होतो. केसांना वारंवार हिट स्टायलिंग करू नका.

English
हिंदी सारांश
Web Title : Amla & Curry Leaves: Natural Remedy for Premature Graying of Hair

Web Summary : Combat premature graying with a homemade amla and curry leaves hair dye. This natural remedy nourishes hair, strengthens roots, and gradually restores color without harsh chemicals. Regular use promotes thicker, healthier, and naturally darker hair.
टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स