Join us

समोरचे केस जास्तच पांढरे झालेत? कांद्याची साल 'या' पद्धतीनं लावा, काळेभोर-दाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 20:50 IST

How to Make Natural Hair Color at Home : (Pandhare kes kale karnyache upay sanga) : पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपायांचाही वापर करू शकता.

केस पांढरे होणं (Grey Hair Solution) हा सर्वात कॉमन प्रोब्लेम असून लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांचे केस पांढरे होतात. केस पांढरे होऊ नयेत यासाठी बाजारात  शॅम्पू, तेल, सिरम, साबण असे अनेक पर्याय आहेत. पण  सर्वांनाच या उत्पादनांच्या वापराने फरक दिसून येतो असं नाही. (Easy Ways to Naturally Darken Your Hair) पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपायांचाही वापर करू शकता. घरगुती उपायांसाठी तुम्हाला हेअर स्पा, ग्लोबल कलरचा  करावा लागतो तसा खर्च करावा लागणार नाही.  रोजच्या वापरातलं साहित्य वापरून तुम्ही केसांना सुंदर, दाट बनवू शकता. केस काळे करण्यासाठी कांद्याच्या सालीचा वापर कसा करायचा ते पाहूया. (Homemade dye for hair)

१) हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरमध्ये मेथीचे दाणे, कांद्याचे साल, बदाम, आल्याचे काप बारीक करून घ्या. हे मिश्रण बारीक झाल्यानंतर व्यवस्थित गरम करून घ्या. गरम झाल्यानंतर थंड करून हे मिश्रण एका बरणीत भरा.

२) आपल्या केसांच्या गरजेनुसार मिश्रण एका वाटीत घेऊन त्यात नारळाचे तेल, व्हिटामीन ई कॅप्सूल घाला. तयार मिश्रण चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्या. हे मिश्रण केसांच्या मुळांना आणि  लांबीवर लावा. ज्या ठिकाणचे केस जास्त पांढरे झाले असतील तिथे हे मिश्रण लावा.

३) एक तासाने केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास केसांवर चांगला परिणाम दिसून येईल यामुळे केस काळेभोर दिसतील.

केस पांढरे का होतात?

१) गरम पाण्यामुळे केसांची मुळं कमकुवत होतात ज्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकतं. केस कमकुवत झाल्यास ते रुक्ष आणि कोरडे दिसतात. त्यामुळे केस कमी वयातच पांढरे दिसतात

२) जे लोक आपल्या केसांना विशी किंवा तिशीतच काळे करणं सुरू करतात तेव्हा त्यांचे  केस वेळेआधीच पांढरे व्हायला सुरूवात होते आणि केस आपले पिग्मेंट गमावतात. हे केमिकल्सयुक्त डाय केसांचे नुकसान करू शकतात.

प्रोटीन हवंय, पनीर-बदाम परवडत नाही? प्रोटीनसाठी हा पदार्थ खा, रस्त्यावर मिळेल १० रूपये वाटा

३) केसांच्या मुळांना पोषण देण्यासााठी तेल लावून नियमित मसाज करा. तुम्ही कोणताही हर्बल मास्कही वापरू शकता.  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तेल तयार करा. त्यात जास्वंद, कढीपत्ते, आवळा आणि ब्राम्ही हे साहित्य असायला हवं. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी