आजच्या धावपळीच्या जीवनात प्रदूषण, धूळ आणि वाढत्या उन्हामुळे आपल्या चेहऱ्याची नैसर्गिक चमक कुठेतरी हरवून जाते. चेहऱ्यावर येणारे काळे डाग, टॅनिंग आणि पिंपल्स घालवण्यासाठी आपण महागड्या पार्लरमध्ये जातो किंवा हजारो रुपयांचे केमिकलयुक्त सिरम विकत घेतो.(natural face serum) त्याचा आपल्या चेहऱ्यावर तात्पुरता फरक दिसतो. पुन्हा चेहरा काळा पडण्याच्या समस्या सतावतात. (homemade face serum)
सुंदर दिसण्यासाठी आपण काय नाही करत? सर्व उपाय करुन पाहतो. महागडे क्रिम्स, ट्रीटमेंट्स.. महिन्याला हजारो रुपये स्किनकेअरवर खर्च करतो.(orange peel serum) पण आपली आई किंवा आजी कायम म्हणायची, फळांच्या साली फेकून नका. त्यात सौंदर्याचं गुपित लपलेलं असतं. स्वयंपाकघरात असलेल्या साध्या संत्र्याच्या सालीमध्ये सौंदर्याचा असा खजिना लपलेला आहे, जो महागड्या फेशियललाही मागे टाकेल. रोज संत्रं खाल्ल्यानंतर फेकून दिली जाणारी संत्र्याची साल योग्य पद्धतीने वापरली, तर ती नैसर्गिक सीरमसारखं काम करते. हे सीरम केवळ चेहरा उजळवत नाही, तर डाग, पिग्मेंटेशन कमी करण्यासही मदत करतं आणि पार्लरचा खर्च वाचवतो.
थंडीत करा ओव्याच्या पानांची कढी, पारंपरिक सोपी रेसिपी! मुलाचं पोट दुखणं आणि खोकलाही होईल कमी
संत्र्याच्या सालीचे सीरम बनवण्यासाठी आपल्याला संत्र्याची साल, कोरफडीचा गर आणि पाणी लागेल. यानंतर आपल्याला संत्री सोलून घ्यावी लागेल. एका पॅनमध्ये पाणी गरम करुन त्यात संत्र्याची सालं घाला. पाण्याचा रंग बदलेपर्यंत उकळवून घ्या. नंतर पाणी गाळून घ्या. त्यात कोरफडीचे गर विरघळवून बाटलीत ठेवा. आपण हे स्प्रे बाटलीत भरुन ठेऊ शकता.
हे सीरम लावण्यापूर्वी त्वचा स्वच्छ धुवा. नंतर त्वचेला लावून आपण झोपू शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आपला चेहरा नैसर्गिकरित्या चमकण्यास मदत होईल. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास आपल्याला फरक जाणवेल.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते. संत्र्याच्या गरापेक्षा त्याच्या सालीमध्ये जास्त प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे घटक त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतात, कोलेजनची पातळी वाढवतात आणि चेहऱ्याला नैसर्गिक 'ग्लो' देतात. त्यामुळे हे त्वचेला ग्लो देण्यास मदत करते.
