Join us

आंघोळीच्या आधी मुलतानी मातीचा 'असा' उपाय करा, दिसाल तरुण-साबण नको की फेसवॉश नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2025 14:30 IST

Benefits of Multani Mitti Facemask: मुलतानी माती चेहऱ्याला कशा पद्धतीने लावावी याची ही एक खास ट्रिक... पिंपल्स आणि ॲक्नेही कमी होतील.(how to make multani mitti face pack for young and tight skin?)

ठळक मुद्दे त्वचेची लवचिकता, घट्टपणा टिकवून ठेवण्यासाठी मुलतानी माती उपयुक्त ठरते.

त्वचेची काळजी घेण्यात आपण थोडं कमी पडलो की मग त्याचे आपल्या त्वचेवर लगेचच परिणाम दिसू लागतात. त्वचा डल, निस्तेज दिसायला लागते. सध्या तर वातावरणात थोडा गारवा आणि कोरडेपणा आलेला आहे. त्यामुळे त्वचा ड्राय व्हायला सुरुवात झाली आहे. कोरडी त्वचा लवकर सुरकुतायला लागते. त्यामुळे मग डोळ्यांच्या भोवती, ओठांच्या दोन्ही बाजुंना फाईन लाईन्स म्हणजेच बारीक सुरकुत्या दिसायला लागतात. म्हणूनच आठवड्यातून एकदा मुलतानी मातीचा एक खास उपाय करून पाहा. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या तर कमी होतीलच पण त्वचेच्या टाईटनेस वाढल्यामुळे तुम्ही आहात त्यापेक्षा जास्त तरुण आणि सुंदर दिसाल.(how to make multani mitti face pack for young and tight skin?)

 

मुलतानी मातीचा फेसमास्क कसा तयार करावा?

मुलतानी मातीचा फेसमास्क घरच्याघरी तयार करणं अतिशय सोपं आहे आणि तो तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने तयार करू शकता.

व्यायाम, डाएट करूनही वजन कमी होत नाही? एक्सपर्ट सांगतात ४ चुका टाळा- वजन उतरेल भराभर

आठवड्यातून एकदा मुलतानी मातीचा पॅक चेहऱ्याला लावायलाच हवा. कारण त्वचेची पीएच लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी मुलतानी माती अतिशय उपयुक्त ठरते. त्वचेचं पीएच संतुलित राहिल्यास त्वचेवर ॲक्ने आणि पिंपल्स येत नाहीत. शिवाय त्वचेची लवचिकता, घट्टपणा टिकवून ठेवण्यासाठीही मुलतानी माती उपयुक्त ठरते.

 

फेसपॅक तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा मुलतानी माती घ्या. त्यामध्ये १ चमचा दही घाला. दह्यामध्ये असणारे घटक त्वचेला चमक देतात आणि त्वचा मॉईश्चराईज करतात. 

गळणाऱ्या केसांमुळे वैताग आला? ५ फळं खा- केसांची मुळं पक्की होऊन वाढतील भराभर

आता त्यामध्येच १ चमचा ॲलोव्हेरा जेल आणि १ चमचा गुलाब पाणी घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्या. यानंतर चेहरा धुवून पुसून घ्या. तयार केलेला लेप चेहऱ्यावर लावा. मान आणि गळ्यावरही हा लेप लावू शकता. नंतर १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्वचेवर छान चमक येईल. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Multani Mitti Face Pack: Get youthful, tight skin naturally.

Web Summary : Combat dry skin and fine lines with a weekly Multani Mitti face pack. This simple DIY mask, combining Multani Mitti, yogurt, aloe vera, and rose water, improves skin elasticity and pH balance for a youthful glow.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी