दिवाळी सरली की लगेचच काही दिवसांत वातावरणात खूप फरक जाणवायला लागतो. वातावरण थंड आणि कोरडं व्हायला लागतं. त्याचा परिणाम लगेचच आपल्या त्वचेवर दिसायला लागतो. त्वचाही कोरडी पडायला सुरुवात होते. त्वचा काेरडी पडू नये म्हणून मग आपण विकतचे मॉईश्चरायजर लावतो. पण शुद्ध तूप वापरून घरच्याघरी अतिशय उत्तम दर्जाचं मॉईश्चरायजर तयार करता येतं (how to make moisturiser from butter?). ते नेमकं कसं तयार करायचं आणि त्यासाठी कोणतं साहित्य वापरायचं ते पाहूया..(home made cream using ghee)
तुपापासून मॉईश्चरायजर कसं तयार करायचं?
शुद्ध तूप वापरून घरच्याघरी माॅईश्चरायजर कसं तयार करायचं याविषयीची माहिती jackfruit_india या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
सध्या जबरदस्त ट्रेण्डिंग असणारा ३×३ फिटनेस फंडा- वजन कमी होईल झरझर, करून पाहा
क्रिम तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये २ चमचे पातळ तूप घ्या. त्या तुपामध्ये १ चमचा बदामाचं तेल, २ चमचे ॲलोव्हेरा जेल, व्हिटॅमिन ई च्या २ कॅप्सूल, १ चमचा गुलाब जल घाला. सगळे पदार्थ एकदा व्यवस्थित हलवून घ्या.
हे मिश्रण सतत काही वेळ हलवत राहावे. जोपर्यंत या मिश्रणापासून क्रिमसारखा पदार्थ तयार होत नाही, तोपर्यंत हे मिश्रण हलवत राहावे.
यानंतर हे मिश्रण एका एअरटाईट काचेच्या डबीमध्ये भरून ठेवा. हे क्रिम तुम्ही रोज रात्री चेहऱ्याला लावा. चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर हे क्रिम लावून चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा.
सोहा अली खानने शेअर केल्या ब्यूटी टिप्स- किचनमधल्या 'या' पिठाचा फेसपॅक खुलवतो तिचं सौंदर्य
काही दिवस नियमितपणे हे क्रिम लावल्यास त्वचेमध्ये खूप चांगला बदल दिसून येईल. तुपामध्ये असणारे व्हिटॅमिन ई त्वचेला छान पोषण देते. याशिवाय गुलाबजल, ॲलोव्हेरा जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल यांच्या एकत्रित परिणामामुळे त्वचा तजेलदार होते.
Web Summary : As winter approaches, combat dry skin by making moisturizer at home using ghee. Mix ghee with almond oil, aloe vera gel, vitamin E capsules, and rose water. Apply nightly for nourished, glowing skin.
Web Summary : सर्दियों में रूखी त्वचा से निपटने के लिए घर पर घी से मॉइस्चराइजर बनाएं। घी को बादाम तेल, एलोवेरा जेल, विटामिन ई कैप्सूल और गुलाब जल के साथ मिलाएं। पोषित, चमकदार त्वचा के लिए रात को लगाएं।