Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात घाम आणि शरीराची दुर्गंधी होईल छूमंतर! घरीच करा मोगऱ्याचे अत्तर; सुवास असा की महागडे परफ्यूमही पडतील फिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2026 09:30 IST

Mogra essential oil benefits for body odor: Long lasting natural perfumes India: घामाच्या दुर्गंधीला पळवून लावणारे हे मोगऱ्याचे अत्तर घरी कसं बनवायचं.

उन्हाळा असो वा पावसाळा घामाची दुर्गंधी ही एक अशी समस्या आहे. जी केवळ आपल्यालाच त्रासदायक ठरत नाही, तर चौघात आपल्याला लाजीरवाणेही करु शकते. ही दुर्गंधी घालवण्यासाठी आपण बाजारातून महागडे डिओडोरंट्स आणि परफ्यूम्स विकत घेतो.(Summer skin care and body fragrance tips) पण या परफ्यूम्सचा सुगंध काही तासांतच उडून जातो आणि त्यातील रसायने आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरु शकतात. अशावेळी जर आपल्याला नैसर्गिक, शुद्ध आणि दीर्घकाळ टिकणारा सुगंध मिळाला तर? (How to use Mogra flowers for fragrance)मोगऱ्याचा सुगंध मनाला प्रसन्न करणारा असतो. मोगऱ्याच्या फुलांपासून बनवलेले नैसर्गिक अत्तर केवळ दुर्गंधी घालवत नाही, व्यक्तिमत्वाला एक वेगळीच ओळख देते. हे अत्तर बनवण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही. (How to get rid of sweat smell naturally) आपल्या बागेतील किंवा बाजारातून आणलेल्या मोगऱ्याच्या फुलांपासून घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे शाही अत्तर तयार करु शकता. याचा सुवास इतका नैसर्गिक आणि मोहक असतो की, त्यापुढे इतर परफ्यूमसही फिके पडतील. घामाच्या दुर्गंधीला पळवून लावणारे हे मोगऱ्याचे अत्तर घरी कसं बनवायचं. 

२०२६ स्पेशल स्लिव्ह्ज डिझाइन, ब्लाऊजच्या ७ प्रकारच्या बाह्या दिसतात इतक्या सुंदर की रोज नेसावीशी वाटेल साडी

साहित्य 

मोगऱ्याची ताजी फुले - दोन मोठी वाटी बेस ऑइल - अर्धी वाटी (जोजोबा ऑईल, बदामाचे तेल किंवा वासरहित शुद्ध खोबरेल तेल).काचेची बाटलीमलमलचा कापड 

कृती 

1. अत्तर बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी मोगऱ्याची फुललेली फुले घ्यावी लागतील. जी ताजी असतील. फुले स्वच्छ करुन त्याचे देठ काढून टाका. नंतर काचेच्या बरणीत बदामाचे तेल घाला. या तेलात मोगऱ्याच्या पाकळ्या घाला. पाकळ्या पूर्ण तेलात बुडाल्या पाहिजेत. 

2. काचेच्या बरणीचे तोंड घट्ट बंद करा आणि ती २ ते ३ दिवस कडक उन्हात ठेवा. उन्हाच्या उष्णतेमुळे मोगऱ्यातील नैसर्गिक तेल आणि सुगंध बेस ऑइलमध्ये मिसळण्यास सुरुवात होते. 

3. २ ते ३ दिवसांनी मलमलच्या कापडाने तेल गाळून घ्या आणि पाकळ्या काढून टाका. त्याच तेलात पुन्हा ताज्या मोगऱ्याच्या पाकळ्या टाका. ही प्रक्रिया ३ ते ४ वेळा करा. जितक्या जास्त वेळा आपण पाकळ्या बदलू तितका अत्तराचा सुगंध जास्त येईल.  नंतर तेल गाळून एका गडद रंगाच्या काचेच्या छोट्या बाटलीत भरून ठेवा. 

4. हे अत्तर नैसर्गिक तेलापासून बनवलेले असल्याने त्वचेवर जास्त काळ टिकते आणि परफ्युमपेक्षा हे अधिक सुवास देते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Make Mogra Attar at Home: Beat Summer Sweat and Body Odor

Web Summary : Beat summer sweat with homemade Mogra attar. This natural perfume uses Mogra flowers and a base oil, offering a long-lasting, pleasant fragrance superior to chemical perfumes. Easy to make at home, it's a natural way to stay fresh.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी