Lokmat Sakhi >Beauty > पार्लरला न जाताही केस होतील सिल्की आणि शायनी, पाहा घरीच करायचा सोपा उपाय

पार्लरला न जाताही केस होतील सिल्की आणि शायनी, पाहा घरीच करायचा सोपा उपाय

Silky and Shiny Hair Home Remedies : जर घरीच एक उपाय करून तुम्ही सिल्की आणि शायनी केस मिळवू शकत असाल, तर पार्लरमध्ये पैसे कशाला खर्च करायचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 14:00 IST2025-06-11T10:41:53+5:302025-06-11T14:00:48+5:30

Silky and Shiny Hair Home Remedies : जर घरीच एक उपाय करून तुम्ही सिल्की आणि शायनी केस मिळवू शकत असाल, तर पार्लरमध्ये पैसे कशाला खर्च करायचे?

How to make hair silky and shiny with flax seeds hair gel mask | पार्लरला न जाताही केस होतील सिल्की आणि शायनी, पाहा घरीच करायचा सोपा उपाय

पार्लरला न जाताही केस होतील सिल्की आणि शायनी, पाहा घरीच करायचा सोपा उपाय

Silky and Shiny Hair Home Remedies : सौंदर्य खुलवण्यासाठी आजकाल महिला किंवा तरूणी भरपूर पैसे खर्च करतात. पैसे देऊन चेहऱ्याचा किंवा केसांचा रंग बदलता येतो. अनेक महिला केस सिल्की आणि शायनी करण्यासाठी सलूनमध्ये तासंतास वेळ घालवतात. पण जर घरीच एक उपाय करून तुम्ही सिल्की आणि शायनी केस मिळवू शकत असाल, तर पार्लरमध्ये पैसे कशाला खर्च करायचे? सोशल मीडियावर केस सिल्की आणि शायनी करण्याची पद्धत सांगणार एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

केस सिल्की कसे करावे?

सगळ्यांना असं वाटत असतं की, त्यांचे केस लांब, दाट, काळे आणि मुलायम असावेत. पण प्रदूषण, पोषक तत्वांची कमतरता, योग्य काळजी न घेणे आणि केमिकल्सचा वापर यामुळे केसांची रंगत उडून जाते. अशात तुम्ही हा घरगुती उपाय करून फायदे मिळवू शकता. तेही कमी खर्चात.

न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात एका नॅचरल हेअर मास्कची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, या उपायानं केस सिल्की आणि शायनी होतात.

अळशीच्या बियांचा हेअर मास्क

अळशीच्या बिया केसांसाठी खूप फायदेशीर असतात. यांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, प्रोटीन, फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. ही केसांसाठी खूप महत्वाची अशी तत्व आहेत.

कसा बनवाल हेअर मास्क?

हा हेअर मास्क बनवणं फार सोपं काम आहे. यासाठी दोन कप पाण्यात दोन चमचे अळशीच्या बिया टाका आणि हे जेलसारखं दिसेपर्यंत उकडा. त्यानंतर याला स्ट्रेन करा. जेव्हा हे जेल थंड होईल तेव्हा त्यात एसेंशिअल ऑइलचे काही थेंब टाका. तुमचं हेअर जेल तयार आहे.

कसं लावाल?

हे हेअर जेल तुम्ही केसांवर थेट लावू शकता आणि लावून २५ ते ३० मिनिटांसाठी तसंच ठेवा. त्यानंतर शाम्पूनं केस धुवा. यानं केसांना खोलवर पोषण मिळेल. महत्वाची बाब म्हणजे हे हेअर जेल तुम्ही ७ ते १० दिवस स्टोर करूनही ठेवू शकता.
 

Web Title: How to make hair silky and shiny with flax seeds hair gel mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.