Join us
Daily Top 2Weekly Top 5

भुवयांचे केस होतील काळे- घनदाट, आल्याचा सोपा उपाय- महागड्या पार्लरचा खर्च वाचेल, आयब्रो दिसतील सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2025 17:14 IST

dark eyebrows naturally: thicker eyebrows remedy: काही घरगुती उपाय केल्यास भुवया दाट होतील आणि भुवयासह पापण्यांच्या केसांचं हरवलेलं सौंदर्य पुन्हा आणू शकतो.

सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक महागड्या स्किनकेअरचा वापर करतो. आपल्या चेहऱ्यावरील प्रत्येक छोट्या गोष्टींकडे लोकांचं विशेष लक्ष जातं, त्यातील एक भुवया.(dark eyebrows naturally) या आपल्या डोळ्यांना उठावदार, सुंदर बनवतात. ज्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात भर देतात. पण ऐन तारुण्यात अनेकांचे भुवयांचे केस पांढरे होतात, विरळ होतात किंवा गळण्याचा त्रास होतो.(ginger for eyebrow growth) चेहऱ्याच्या सौंदर्यात भुवया आणि पापण्या महत्त्वाची भूमिका बजावतात. (natural eyebrow growth tips) ज्यामुळे भुवयांचे केस दाट, काळेभोर आणि भरीव असेल तर चेहरा आणि डोळे अधिक खुलून दिसतात. पण अनेकदा भुवया बारीक किंवा केस पांढरे दिसू लागले की चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते. ब्यूटी प्रॉडक्टसच्या अतिप्रमाणात वापर केल्यास भुवयांच्या केसांवर परिणाम होतो. ज्यामुळे केस निस्तेज, पांढरे आणि विरळ होऊ लागतात.(how to grow thick eyebrows) अशावेळी पार्लरमध्ये जाऊन भरपूर पैसे खर्च करण्यापेक्षा काही घरगुती उपाय केल्यास भुवया दाट होतील आणि भुवयासह पापण्यांच्या केसांचं हरवलेलं सौंदर्य पुन्हा आणू शकतो. 

महागडा च्यवनप्राश घरी करण्याची पाहा पारंपरिक प्रमाणबद्ध रेसिपी, इम्युनिटी वाढवणारी आवळ्यांची जादू

भुवयांना दाट करण्यासाठी पेन्सिल, काजळ किंवा इतर ब्यूटी प्रॉडक्टस वापरण्याऐवजी आपण एरंडेल तेल, आल्याचा रस आणि बदामाचे तेल वापरु शकतो. त्यासाठी आपल्याला एक वाटी घेऊन त्यात एरंडेल तेल आणि बदामाचे तेल मिसळावे लागेल. यानंतर आले किसून घ्या. त्याचा रस काढून तयार मिश्रणात घाला. हे तीन घटक व्यवस्थित मिसळा. 

रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. तयार मिश्रणात कापसाचा भोळा भिजवून भुवयांना लावा. सकाळी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. नियमितपणे हा उपाय केल्यास भुवया जाड व काळ्य होतील. स्वयंपाकघरात रोज वापरलं जाणारं आले हे भुवयांसाठी फायदेशीर आहे. आल्यात नैसर्गिक उष्ण घटक असतात जे केसांच्या मुळांना पोषण देतात. ज्यामुळे रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे ज्या ठिकाणी कमी केस असतात त्या ठिकाणी नवीन केस उगवण्यास मदत होते. यातील अँटिऑक्सिडंट्स केसांना काळा आणि नैसर्गिक रंग देतात. नियमित वापरल्यास भुवया घनदाट होण्याबरोबरच अधिक आकर्षक दिसू लागतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Get thick, dark eyebrows naturally with ginger: a simple home remedy.

Web Summary : Ginger, castor oil, and almond oil can help darken and thicken eyebrows. Apply nightly for naturally beautiful brows, saving on salon costs.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी