बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं की दिवसभराच्या कामांमध्येच त्या एवढ्या अडकून गेलेल्या असतात की त्यातून स्वत:साठी, स्वत:च्या त्वचेची काळजी घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. त्यामुळे मग नियमितपणे पार्लरमध्ये जाऊन फेशियल, क्लिनअप होत नाही. अशा सर्व महिलांसाठी पुढे सांगितलेला एक उपाय निश्चितच खूप उपयुक्त ठरणारा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरगुती साहित्यच लागणार आहे (how to remove tanning from skin?). हा उपाय जर तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा केला तर तुम्हाला टॅनिंग, डेडस्किनचा त्रास होणार नाही.(best home hacks for removing tanning)
टॅनिंग, डेडस्किन काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय
हा उपाय करण्यासाठी एक ते दिड चमचा हळद घ्या आणि त्यानंतर ती तव्यावर किंवा कढईमध्ये घालून भाजून घ्या. जोपर्यंत हळदीचा रंग हलका चॉकलेटी होत नाही तोपर्यंत ती मंद आचेवर भाजत राहावी.
भाजून घेतलेली हळद एका वाटीमध्ये काढा. ती थंड झाल्यानंतर त्यामध्ये १ चमचा कॉफी पावडर घाला. डेडस्किन कमी करून त्वचेला फ्रेश करण्यासाठी कॉफी पावडर खूप उपयुक्त ठरते.
यानंतर त्यामध्ये १ चमचा मध घाला. मधामुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते. यानंतर त्यामध्ये ३ ते ४ थेंब लिंबाचा रस आणि एक चमचा दही घाला. दही आणि लिंबाचा रस या दोन्हींमुळे त्वचेचा काळवंडलेपणा कमी होतो. आता हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. त्यानंतर ते चेहऱ्याला लावा आणि ५ ते ७ मिनिटे चेहऱ्याला हलक्या हाताने मालिश करा.
थंडीमुळे त्वचा कोरडी, भुरकट दिसतेय? रात्री झोपताना किचनमधले ४ पदार्थ लावा- त्वचा मऊ, चमकदार होईल
यानंतर १५ मिनिटे तो लेप चेहऱ्यावर तसाच राहू द्या आणि त्यानंतर हलक्या हाताने मालिश करत चेहरा धुवून टाका. चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चरायजर लावा. त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल आणि त्वचा एकदम फ्रेश, चमकदार झालेली दिसेल. ट्राय करून पाहा.
Web Summary : Busy women can remove tan and dead skin with a homemade mask. Roast turmeric, add coffee powder, honey, lemon juice, and yogurt. Apply, massage, and rinse for fresh, glowing skin.
Web Summary : व्यस्त महिलाएं घर के बने मास्क से टैन और डेड स्किन हटा सकती हैं। हल्दी भूनें, कॉफी पाउडर, शहद, नींबू का रस और दही मिलाएं। लगाएं, मालिश करें और ताज़ा, चमकती त्वचा के लिए धो लें।