उन्हाळ्यात कडक उन्हामुळे केवळ शरीरालाच नाही, तर आपल्या त्वचेलाही प्रचंड थकवा जाणवतो. घामामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक नाहीशी होते आणि त्वचा निस्तेज दिसू लागते.(Cucumber and Tulsi Face Toner) कडक ऊन, धूळ आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर टॅनिंग, काळे डाग आणि पिंपल्स येणे ही समस्या सामान्य बनली आहे. बाजारात मिळणारे महागडे रासायनिक टोनर वापरतो, परंतु त्यातील रसायने त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. (Natural Skin Cooling Tips)अशावेळी स्वयंपाकघरात आढळणारी काकडी आणि तुळशी त्वचेसाठी वरदान ठरु शकते. (Homemade Toner for Summer)काकडीत पाण्याचे प्रमाण भरपूर असते, जे आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवते आणि थंडावा देते. तुळस ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, ज्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जेव्हा आपण या दोन गोष्टींचे 'टोनर' म्हणून एकत्र वापर करतो, तेव्हा ते चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल नियंत्रित करते आणि त्वचेला आतून स्वच्छ करते. हे नैसर्गिक टोनर केवळ टॅनिंग कमी करत नाही, तर पिंपल्स येणेही थांबवते. हे टोनर घरच्या घरी कसं बनवायचं पाहूया.
टोनर बनवण्यासाठी लागणारे साहित्य
काकडी - १ मध्यम आकाराची तुळशीची पाने - १० ते १२ पानेगुलाब पाणी - २ ते ३ चमचे लिंबाचा रस - अर्धा चमचा स्प्रे बॉटल
टोनर बनवण्याची कृती
1. सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून घ्या आणि तिचे साल काढून किसून घ्या. किसलेली काकडी गाळणीने दाबून तिचा ताजी रस एका वाटीत काढून घ्या.
2. तुळशीची पाने स्वच्छ धुवून घ्या. खलबत्त्यात थोडी कुस्करुन घ्या किंवा मिक्सरमधून अगदी थोड्या पाण्यासह त्याची पेस्ट करुन रस काढा.
3. एका बाऊलमध्ये काकडीचा रस आणि तुळशीचा रस एकत्र करा. आता यात २ चमचे गुलाब पाणी मिसळा. त्वचेचे पीएच लेव्हल संतुलित राहिल. हे स्वच्छ स्प्रे बाटलीत भरून ठेवा.
4. हे टोनर वापरण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर हे टोनर स्प्रे करा किंवा कापसाच्या मदतीने लावा. हे टोनर लावल्यानंतर चेहरा पुसू नका. हे त्वचेत आपोआप शोषले जाईल. दिवसातून दोन ते तीन वेळा याचा वापर केल्यास जाणवेल.
5. हे टोनर चेहऱ्यावरील मोठी छिद्रे कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा घट्ट आणि तरुण दिसते.
Web Summary : Combat summer skin fatigue with a homemade cucumber and basil toner. This natural remedy hydrates, controls oil, reduces tanning and prevents pimples. The simple recipe includes cucumber juice, tulsi extract, rose water, and lemon juice. Apply after cleansing for a refreshed, youthful complexion.
Web Summary : खीरा और तुलसी के टोनर से गर्मी में त्वचा की थकान से लड़ें। यह प्राकृतिक उपाय हाइड्रेट करता है, तेल नियंत्रित करता है, टैनिंग कम करता है और पिंपल्स को रोकता है। आसान रेसिपी में खीरे का रस, तुलसी का अर्क, गुलाब जल और नींबू का रस शामिल हैं। ताज़ा, युवा रंगत के लिए सफाई के बाद लगाएं।