Join us

ना साबण, ना लोशन! करा वाटीभर बेसनाचा घरगुती फेसवॉश - त्वचेच्या समस्या गायब, दिसाल सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2025 17:46 IST

How to Make Besan Face Wash at Home : Besan Face Wash For a Flawless Skin : Homemade Besan Face Wash for Glowing Skin : केमिकल्सयुक्त साबण - फेसवॉशऐवजी हा घरगुती बेसनाचा फेसवॉश वापरणं कधीही त्वचेसाठी उत्तमच...

आपल्या चेहऱ्याची त्वचा ही फारच नाजूक व संवेदनशील असते. यासाठीच, संपूर्ण शरीराच्या त्वचेपेक्षा चेहऱ्याच्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात धूळ, प्रदूषण आणि घामामुळे त्वचेवर मळ साचतो. त्वचेवर असा घाणीचा थर साचून राहिल्यामुळे आपली त्वचा डल, निस्तेज व खराब (How to Make Besan Face Wash at Home) दिसू लागते. अशावेळी त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साबण किंवा फेसवॉशचा ( Besan Face Wash For a  Flawless Skin) वापर करतो. परंतु या साबण आणि फेसवॉशमध्ये त्वचेसाठी हानिकारक असे केमिकल्स फार मोठ्या प्रमाणात असतात. अशा हानिकारक केमिकल्सयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्च्या सततच्या वापरामुळे त्वचेचे नुकसान होते. यासाठीच, त्वचेला आतून व बाहेरून स्वच्छ ठेवण्यासाठी घरगुती आणि नैसर्गिक उपाय करणे कधीही उत्तमच(Homemade Besan Face Wash  for Glowing Skin).

त्वचेसाठी साबण किंवा फेसवॉशचा वापर न करता, नैसर्गिक, पारंपरिक आणि सुरक्षित पर्याय म्हणजे बेसनाचा फेसवॉश. बेसन हे घरात सहज उपलब्ध असून, त्यात क्लिन्झिंग, टॅन रिमूव्हिंग आणि तेल नियंत्रित करण्याचे गुणधर्म असतात. जर तुम्हाला चेहरा नैसर्गिकरित्या स्वच्छ, मऊ आणि उजळ ठेवायचा असेल, तर साबण - फेसवॉशऐवजी हा बेसनाचा फेसवॉश वापरणं हा एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय ठरु शकतो. यासाठी घरच्याघरीच बेसनाचा फेसवॉश कसा तयार करायचा ते पाहा.    

साहित्य :- 

१. मुलतानी माती - १ कप २. बेसन - १ कप ३. तांदुळाचे पीठ - १ कप ४. कस्तुरी हळद - १ कप  ५ कच्चे दूध - ३ ते ४ टेबलस्पून 

मूठभर कांद्याच्या टरफलांनी करा नॅचरल हेअर कलर, पांढरे केसही होतील १५ मिनिटांत काळेभोर...

घरगुती नॅचरल फेसवॉश नेमका कसा तयार करायचा ? 

घरच्याघरीच नैसर्गिक पद्धतीने फेसवॉश तयार करण्यासाठी सर्वातआधी एक मोठा बाऊल घेऊन त्यात, मुलतानी माती, बेसन, तांदुळाचे पीठ, कस्तुरी हळद असे सगळे जिन्नस घालून एकत्रित चमच्याने कालवून एकजीव करून फेसवॉश पावडर तयार करून घ्यावी. ही तयार फेसवॉश पावडर एका हवाबंद काचेच्या बरणीत भरून स्टोअर करून ठेवावी. 

घनदाट- काळ्याभोर लांबसडक केसांसाठी मोहरीच्या तेलात मिसळा ३ पदार्थ, केसांचं रुपच पालटेल...

केसांना टोकं फुटल्यामुळे सतत केस कापता? १ घरगुती हेअर मास्क - स्प्लिट एंड्स होतील कमी...

याचा वापर नेमका कसा करावा ? 

दररोज आंघोळ करण्यापूर्वी चमचाभर ही तयार फेसवॉश पावडर एका बाऊलमध्ये काढून घ्यावी. त्यानंतर, यामध्ये गरजेनुसार कच्चे दूध ओतून त्याची पातळसर अशी पेस्ट तयार करून घ्यावी. ही तयार पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून १० मिनिटे तसेच ठेवून द्यावे. १० मिनिटानंतर हलकेच हाताने मसाज करत थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. दररोज साबणाऐवजी आपण हा नॅचरल घरगुती फेसवॉश वापरु शकता. यामुळे अगदी काहीच दिवसांत तुम्हाला तुमच्या त्वचेत झालेला बदल दिसून येईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय