ऋतू बदलला की, त्याचा आपल्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो. ऑक्टोबर हीट संपता-संपता हवेतील गारवा हळूहळू जाणवायला लागतो. (beetroot lip balm) दिवसभर ऊन आणि रात्री हलकी थंडी या बदलत्या वातावरणाचा परिणाम सगळ्यात जास्त आपल्या त्वचेवर आणि ओठांवर होताना दिसतो. (natural lip balm for dry lips) ओठ फुटणे, कोरडे पडणे किंवा लिपस्टिक लावल्यानंतरही ओठ नॅचरल न दिसणे. यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. (homemade lip balm)
अनेकजण ओठांची काळजी घेण्यासाठी लिप बाम, लिप स्क्रब करतात. क्रीम्स किंवा मॉइश्चरायझ लावतात पण याने ही समस्या काही काळापूर्ती बरी होते.(beetroot lip care) पण केमिकल्समुळे ओठ काळे पडतात. पण काही सोपे घरगुती उपाय केल्यास फुटलेले ओठ नव्यासारखे होतील आणि गुलाबी देखील दिसतील.(pink lips naturally) बदलत्या ऋतुमुळे आपले ओठ फाटले असतील तर आपण घरी नैसर्गिक लिप बाम बनवू शकतो.(lip balm before lipstick) आपण बीटापासून लिप बाम बनवू शकता. बीटामध्ये विविध प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक रंग असतात. जे ओठांना फक्त मऊ नाही तर गुलाबी देखील करतात.
नारळाचं तेल लावल्यानं कमी होतात स्ट्रेच मार्क्स? डॉक्टरांचा सल्ला, ‘असे’ लावा नारळाचे तेल
बीटरुट लिप बाम बनवण्यासाठी आपल्याला बीट धुवून, सोलून त्याचे लहान तुकडे करावे लागतील. आता ब्लेंडरमध्ये वाटून त्याचा रस काढा. एका स्वच्छ कंटेनरमध्ये हा रस गाळून घ्या. एका भांड्यात एक चमचा खोबरेल तेल आणि मेण घालून ते वितळवून घ्या. वितळल्यानंतर त्यात २ चमचे बीटाचा रस घालून चांगले मिसळा. फ्रीजमध्ये सेट होण्य़ास ठेवा. या पद्धतीने आपण नैसर्गिक आणि घरगुती पद्धतीने लिप बाम बनवू शकतो.
बीटाचे लिप बाम लावण्याचे ओठांना अनेक फायदे आहेत. ते ओठांना मऊ ठेवते आणि त्यांना नैसर्गिक चमक देते. यात कोणतेही रसायने नसतात. ज्यामुळे संवेदनशील त्वचा असलेल्यांसाठी हे चांगले आहे. बीटामुळे ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग मिळतो.