Join us
Daily Top 2Weekly Top 5

केसांच्या वाढीसाठी पिकलेल्या केळ्याचे तेल आहे १ नंबर! केसांची वाढ पाहून मैत्रिणी विचारतील काय आहे सिक्रेट ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2026 15:23 IST

how to make banana aloe vera hair oil at home : homemade banana aloe vera hair oil : banana aloe vera oil benefits for hair : पिकलेली केळी फेकून देण्याची चूक करू नका! केळ्याच्या तेलाने होतील गुडघ्यापर्यंत लांब केस...

आजच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये केस गळणे, केस पातळ होणे आणि वाढ खुंटणे या समस्या खूपच कॉमन झाल्या आहेत. केसांसाठीच्या या समस्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर आणि सुरक्षित ठरतात. आयुर्वेद आणि पारंपरिक पद्धतींमध्ये केळे, तांदूळ आणि कोरफड यांसारख्या घटकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या घटकांचा वापर करून तयार केलेले घरगुती तेल केसांच्या मुळांना खोलवर पोषण देते. पिकलेले केळे हे केवळ एक फळ नसून केसांसाठी लागणाऱ्या पोषक घटकांचा खजिना आहे. जेव्हा आपण केळ्याला तांदूळ आणि कोरफडीसारख्या घटकांसोबत तेलात शिजवतो, तेव्हा एक शक्तिशाली हेअर ऑईल तयार होते. केसांच्या लांबीपासून ते स्काल्पच्या आरोग्यापर्यंत सर्व समस्यांवर हे घरगुती तेल रामबाण उपाय ठरू शकते(banana aloe vera oil benefits for hair).

 

केळ, कोरफड, तांदूळ यामध्ये असलेले पोषक घटक केसांना आवश्यक पोषण देतात, केसांची मुळे मजबूत करतात आणि केसांची वाढ जलद होण्यास मदत करतात. विशेष म्हणजे केळ्यापासून तयार केलेलं घरगुती तेल वापरणं सोपं असून त्याचा कोणताही साइड इफेक्ट नसतो. नियमित वापर केल्यास केस मऊ, चमकदार आणि दाट होण्यास मदत मिळू शकते. जर तुम्हालाही नैसर्गिक पद्धतीने केसांची वाढ व्हावी असे वाटत असेल, तर केळ्याचं (homemade banana aloe vera hair oil) हे घरगुती तेल तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतं. लांबसडक, काळेभोर आणि निरोगी केस हवे असतील, तर पिकलेल्या केळ्यापासून तेल कसे बनवायचे आणि (how to make banana aloe vera hair oil at home) त्याचे फायदे काय आहेत, ते पाहूयात. 

साहित्य :- 

१. केळं - १ कप (पिकलेलं)२. एलोवेरा जेल - १/२ कप ३. तांदूळ - २ टेबलस्पून ४. खोबरेल तेल - २ कप 

केसांसाठी पिकलेल्या केळ्यांच तेल कसं तयार करायचं ? 

 सगळ्यांत आधी एका मिक्सरच्या भांड्यात पिकलेल्या केळ्याचे काप, एलोवेरा जेल, तांदूळ असे सगळे जिन्नस एकत्रित घालून त्याची पातळसर अशी वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. मग एका लोखंडी कढईत खोबरेल तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. या गरम खोबरेल तेलात मिक्सरमध्ये वाटून घेतलेली तयार पेस्ट घालावी. मग चमच्याने हळूहळू हलवत या पेस्टचा रंग पूर्णपणे करपून काळा होत नाही तोपर्यंत मंद आचेवर मिश्रण गरम करून घ्यावे. त्यानंतर गॅस बंद करून तेल थोडं थंड होऊ द्यावं. तेल पूर्णपणे थंड झाल्यावर बारीक जाळीच्या गाळणीने गाळून एका काचेच्या बाटलीत भरून स्टोअर करून ठेवावं. गरजेनुसार आपण केसांसाठी या तेलाचा वापर करू शकता. 

वेणी घाला किंवा आंबाडा, केस दिसतील दाट - जाडजूड! लोखंडी कढईत केलेलं  'असं' लावा, केस होतील सुंदर...

अंकिता लोखंडेचं 'झिरो बजेट' स्किनकेअर रुटीन. चाळिशी उलटूनही दिसते सुंदर-चेहऱ्यावर तेज...

या तेलाचा वापर कसा करावा ? 

सर्वात आधी हे तेल केसांना लावताना थोडं हलकं गरम करून लावल्यास ते स्काल्पमध्ये चांगल्या प्रकारे शोषलं जातं. कोमट तेल बोटांच्या मदतीने स्काल्प आणि केसांच्या खालच्या टोकांपर्यंत लावून मसाज करून घ्यावा. रात्रभर तेल केसांवर तसेच लावून ठेवून द्यावे. दुसऱ्या दिवशी सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत. 

मनानं स्ट्रॉंग व्हायचं असेल तर ७ गोष्टी करा, कुठल्याही परिस्थितीचा सामना कराल हसत हसत...

हे घरगुती केळ्याचे तेल केसांसाठी वापरण्याचे फायदे... 

१. पिकलेलं केळ :- केळ्यामध्ये नैसर्गिक तेल आणि पोटॅशियम असते, जे केसांना मऊ करण्यास आणि त्यांची लवचिकता सुधारण्यास मदत करते. हे केसांमधील ओलावा टिकवून ठेवते, ज्यामुळे कोरड्या आणि निर्जीव केसांची समस्या दूर होते. हे केसांमधील ओलावा टिकवून ठेवते, ज्यामुळे कोरड्या आणि निर्जीव केसांची समस्या दूर होते.

२. तांदूळ :- तांदळामध्ये 'इनॉसिटॉल' नावाचे कार्बोहायड्रेट असते, जे खराब झालेले केस आतून दुरुस्त करण्याचे काम करते. यातील अमिनो ॲसिड्स केसांच्या मुळांना मजबूती देतात, ज्यामुळे केस गळणे कमी होते. तांदळामुळे केसांना एक नैसर्गिक चमक मिळते आणि केस घनदाट दिसू लागतात.

३. एलोवेरा जेल :- एलोवेरामध्ये दाहशामक गुणधर्म असतात, जे स्काल्पला येणारी खाज आणि कोंड्याची समस्या कमी करतात. हे केसांसाठी उत्तम नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते, ज्यामुळे केस रेशमी आणि मऊ होतात. हे स्काल्पचा पीएच (pH) स्तर संतुलित राखण्यास मदत करते, ज्यामुळे केसांची वाढ वेगाने होते.

४. खोबरेल तेल :- खोबरेल तेल केसांच्या मुळाशी खोलवर जाऊन केसांना पोषण देते. हे केसांमधील प्रथिनांचे होणारे नुकसान रोखते, ज्यामुळे केस निरोगी राहतात. यातील फॅटी ॲसिड्स केसांचे बाहेरील प्रदूषणापासून संरक्षण करतात आणि केसांना मजबुती देतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Banana hair oil: The secret to hair growth revealed!

Web Summary : Struggling with hair fall? This homemade banana oil, enriched with aloe vera and rice, nourishes hair from root to tip. Regular use promotes soft, shiny, and thick hair, naturally. Learn how to make this hair oil at home.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय