शेवग्याच्या शेंगांचा पाला (Skin Care) हा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आणि आरोग्यवर्धक मानला जातो. शेवग्याच्या शेंगांच्या पानांपासून शेंगांच्या सालींपर्यंत सगळंच आरोग्यासाठी पौष्टिक असल्याने (How to use moringa leaf for a radiant skin) आपण त्याचा वापर करतो. शेवगा, ज्याला इंग्रजीत Moringa असे म्हणतात, ही पोषणमूल्यांनी भरलेली एक औषधी ( Moringa Powder Face pack) वनस्पती आहे. शक्यतो शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याची भाजी, चटणी किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ केले जातात. असे असले तरीही खाण्यासोबतच शेवग्याच्या शेंगांचा पाला त्वचेसाठी देखील तितकाच फायदेशीर असतो(How to make A Face Mask Using Moringa leaf Powder).
शेवग्याच्या शेंगांच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे विशेषतः व्हिटॅमिन सी आणि ए असतात याचबरोबर त्वचेला पोषण देणारे घटक भरपूर प्रमाणात असतात. त्वचेसाठी अनेक घरगुती उपाय करताना आपण वेगवेगळ्या औषधी पावडर वापरतोच. शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याची पावडर करून तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावरील मुरुम, डाग, पिगमेंटेशन, कोरडेपणा आणि त्वचेच्या इतर त्रासांवर उपयुक्त ठरतो. त्वचेला स्वच्छ, टवटवीत आणि उजळ ठेवण्याच्या दृष्टीने हा एक नैसर्गिक, सुरक्षित आणि फायदेशीर असा उपाय आहे. शेवग्याच्या शेंगांच्या पाला जर घरी आणला तर त्याची फक्त भाजी किंवा चटणी न करता, त्वचेसाठी फेसपॅक कसा तयार करायचा ते पाहूयात...
साहित्य :-
१. शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याची पावडर - २ टेबलस्पून २. मध - १ टेबलस्पून ३. दही - १ टेबलस्पून४. एलोवेरा जेल - १ टेबलस्पून
कृती :-
सगळ्यांत आधी एका मोठ्या बाऊलमध्ये शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याची पावडर घ्यावी. त्यानंतर, या शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याच्या पावडरमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून मध, दही, एलोवेरा जेल घालावे. आता सगळे घटक एकजीव करून चमच्याच्या मदतीने मिश्रण व्यवस्थित कालवून घ्यावे. फेसपॅक चेहेऱ्याला लावण्यासाठी तयार आहे.
मेहेंदी लावली की केस लाल-तांबडे दिसतात? ५ सोपे उपाय, केस दिसतील सुंदर कलर केल्यासारखे...
याचा कसा वापर करावा ?
शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याचा फेसपॅक ब्रशच्या किंवा बोटांच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्यावा. त्यानंतर १० ते १५ मिनिटे हा फेसपॅक चेहऱ्यावर तसाच राहु द्यावा, किंवा आपण संपूर्ण फेसपॅक सुकेपर्यंत देखील चेहऱ्यावर लावून ठेवू शकता. फेसपॅक संपूर्ण वाळून सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करावा. आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा आपण हा उपाय करू शकता.
स्वतःला लावलेल्या 'या' ६ सवयींमुळेच रेखाचं सौंदर्य आहे खास! वयाच्या सत्तरीतही सुंदरच...
हा फेसपॅक वापरण्याचे फायदे...
१. या फेसपॅकच्या नियमित वापरामुळे त्वचेवर एक नैसर्गिक चमक येते.२. शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याचा फेसपॅक त्वचेला आवश्यक असलेले पोषण मिळवून देते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार होते. ३. शेवग्याच्या शेंगांच्या पाल्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे मुरुम आणि पिंपल्स दूर होतात.४. या फेसपॅकच्या नियमित वापराने त्वचेवरील गडद डाग, ब्लॅकहेड्स, व पिग्मेंटेशन कमी होऊ लागते.५. ऑयली स्किन असणाऱ्यांसाठी हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे चेहऱ्यावरचे जास्तीचे तेल शोषून घेऊन त्वचेची छिद्र स्वच्छ ठेवली जातात.