वयाची चाळीशी पार केल्यानंतर स्त्रियांच्या चेहरा निस्तेज दिसू लागतो. त्वचा कोरडी पडणे, लवकर सुरकुत्या दिसणे, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे निर्माण होणे, त्वचा निस्तेज होणे किंवा चेहरा थकल्यासारखा वाटतो.(youthful skin after 40) हार्मोनल बदल, स्ट्रेस, अपुरी झोप, पाणी कमी पिणे आणि चुकीचा स्किनकेअर रुटीन यामुळे त्वचेचे नैसर्गिक तेज हळूहळू कमी होत जाते. (anti-aging water for skin)वय वाढू लागले की त्वचेवर सुरकुत्या येतात. आपले वय वाढलेले दिसू लागते.(natural glow after 40) वृद्धत्व येऊ लागते, चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसतात.(rose water) पण त्वचेला परत तरुण बनवणारा एक साधा आणि घरगुती उपाय आहे.(hydrated skin tips winter) फेशियल वॉटर, म्हणजेच एका विशिष्ट वनस्पतींच्या अर्कातून बनवलेले पौष्टिक पाणी.
कोथिंबीरीची वडी करण्यासाठी १ खास टिप, हिरव्यागार कोथिंबीरीची करा खमंग-कुरकुरीत वडी
आजकाल ब्यूटी इंडस्ट्रीमध्ये “स्किन हायड्रेटिंग वॉटर”ची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. पण या महागड्या प्रोडक्ट्सपेक्षा निसर्गातील साध्या घटकांपासून बनवलेले पाणी त्वचेला जास्त सुरक्षित आणि फायदेशीर ठरते. गुलाबपाणी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावले तर त्वचेतील ओलावा वाढतो, पेशींमध्ये रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करायला लागते.
आपण चेहऱ्यावर टोनर म्हणून गुलाबपाणी वापरु शकता. आपण हे पाणी हवे तितक्या वेळा चेहऱ्याला लावू शकतो. यामुळे आपली त्वचा नैसर्गिकरित्या चमकेल. आपण गुलाबपाणी, कडुलिंब पावडर मिसळून चेहऱ्याला लावायला हवी. यामुळे त्वचा मऊ, स्वच्छ आणि चमकदार होईल. यामुळे मुरुमांचे प्रमाण देखील कमी होते.
सुरकुत्या हे वृद्धत्वाचे लक्षण आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असतील तर चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा घट्ट होईल. ओपन पोअर्सचा त्रास असेल तर गुलाबपाणी आणि मुलतानी माती मिसळून चेहऱ्याला लावा. ज्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होईल.
Web Summary : After 40, skin loses its glow. Rose water hydrates, improves circulation, and reduces wrinkles. Use it as a toner or mix with neem or sandalwood powder for radiant, youthful skin. Multani mitti helps with open pores.
Web Summary : 40 के बाद त्वचा अपनी चमक खो देती है। गुलाब जल हाइड्रेट करता है, रक्त परिसंचरण में सुधार करता है और झुर्रियों को कम करता है। इसे टोनर के रूप में प्रयोग करें या नीम या चंदन पाउडर के साथ मिलाकर चमकदार, युवा त्वचा पाएं। मुल्तानी मिट्टी खुले छिद्रों में मदद करती है।