Join us
Daily Top 2Weekly Top 5

५ सवयींमुळे तुम्ही दिसता गबाळ्या-बावळ्या? ‘एवढा’ बदल करा-दिवसभर दिसाल स्टायलिश-आकर्षक आणि स्मार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2025 18:52 IST

How to Look Stylish at Home?: गृहिणींनी काही छोटे छोटे बदल केले तर त्या नक्कीच दिवसभर घरात राहूनही जास्त स्मार्ट, आकर्षक, स्टायलिश दिसू शकतील.(5 tips for stylish and good looking housewife)

ठळक मुद्देकाही साधे- सोपे बदल करा. तुम्हालाही अगदी छान वाटेल आणि तुम्हाला रोज पाहणाऱ्यांनाही तुमच्यातला बदल नक्कीच आवडेल

गृहिणी आहोत म्हणून घरात कसंही राहायचं अशी अनेकींची सवय असते. आपल्याला कुठे बाहेर जायचं आहे किंवा आपल्याला कोण पाहणार असा त्यांना वाटतं आणि त्यामुळे अगदी कसेही कपडे घातले जातात. केस विंचरले तर विंचरायचे नाहीतर तसेच वर बांधून टाकायचे अशी सवयही अनेकजणींना असते. पण तुमचं असं राहणं ना तुम्हाला मनापासून आवडतं ना तुमच्या घरच्यांना पटतं. काही दिवसांनी मग नवरा, मुलं राहणीमानावरून बोलायला लागले की ते सहन होत नाही. वाईट वाटतं. म्हणूनच काही साधे- सोपे बदल करा (how to look stylish at home?). तुम्हालाही अगदी छान वाटेल आणि तुम्हाला रोज पाहणाऱ्यांनाही तुमच्यातला बदल नक्कीच आवडेल (simple tips for housewife to look attractive and stylish). दिवसभर कामं करूनही मग बघा तुम्ही कशा स्मार्ट, आकर्षक, स्टायलिश दिसाल...(5 tips for stylish and good looking housewife)

घरातल्या घरात स्मार्ट, स्टायलिश दिसण्यासाठी गृहिणींसाठी खास टिप्स

 

१. बहुतांश लोकांची ही सवय असते की बाहेर जाण्याचे कपडे जुने झाले की ते घरात वापरायला काढायचे. असं करण्यात काही गैर नाही. पण त्या कपड्यांचे रंग पुर्णपणे उडाल्यावर किंवा त्यांची रया गेल्यावर त्यांना घरात वापरायला काढू नका. किंवा घरातले कपडे अगदी जीर्ण होईपर्यंत धोपटून वापरू नका. घरातले कपडे नेहमी चांगलेच असावे. तुम्ही हवं तर सध्या ट्रेण्डिंग असणारे कॉर्ड सेट पण घरात वापरायला घेऊ शकता.

केस धुण्यासाठी 'या' पद्धतीने जादुई पाणी तयार करा, केस गळणं बंद होऊन वाढतील भराभर

२. घरात असलं की कशाला हवाय मेकअप असं वाटतं. पण असं करू नका. तुमचं स्किन केअर रुटीन जपा. क्लिंझिंग, टोनिंग, मॉईश्चरायजर, सनस्क्रिन लोशन, बॉडी लोश, नाईट क्रिम यांचा रोजच्या रोज वापर करा. कारण या सगळ्या गोष्टींमुळे त्वचेचं सौंदर्य टिकून राहण्यास मदत होते. 

३. आंघोळ झाल्यानंतर एक हलकासा परफ्यूम अंगावर मारायला विसरू नका. किंवा अत्तर, बॉडी स्प्रे, डिओ असं जे तुम्हाला आवडेल ते वापरा. पण नक्की वापरा. कारण तुमच्या अंगाला येणारा मंद सुगंध दिवसभर तुम्हालाही फ्रेश ठेवतो.

 

४. घरात तर राहायचंय मग कसेही केस विंचरायचे आणि त्यांचा वर घट्ट अंबाडा बांधून टाकायचा अशी अनेकींची सवय असते. अनेक जणी तर रोजच्या रोज केस विंचरतही नाहीत. पण असं करणं टाळा. केस विंचरून त्यांची छान बो किंवा वेणी किंवा आणखी कोणती तुमची नेहमीची हेअरस्टाईल करा आणि दिवसभर तसेच राहा. छान वाटेल.

भाजीला चव येण्यासाठी घाला 'हा' चमचाभर मसाला, सुगंध असा की शेजारचेही रेसिपी विचारायला येतील.. 

५. पुर्ण दिवस घरातच राहायचं असलं तरी पावडर किंवा कॉम्पॅक्ट, टिकली, काजळ, कानातले, लिपग्लॉस किंवा लिपबाम असा बेसिक मेकअप करा. यामुळे तुम्ही नक्कीच सुंदर, आकर्षक दिसाल. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Housewives: Simple tips to look stylish and attractive at home.

Web Summary : Housewives can look stylish at home by avoiding old, worn-out clothes and maintaining a skincare routine. Use perfume, style hair daily, and apply basic makeup. Small changes enhance appearance and boost confidence.
टॅग्स :ब्यूटी टिप्सस्टायलिंग टिप्सफॅशनत्वचेची काळजीकेसांची काळजी