Lokmat Sakhi >Beauty > खऱ्याखुऱ्या वयापेक्षा अधिक तरुण दिसण्यासाठी ६ मेकअप टिप्स, दिसाल जास्त सुंदर- आकर्षक

खऱ्याखुऱ्या वयापेक्षा अधिक तरुण दिसण्यासाठी ६ मेकअप टिप्स, दिसाल जास्त सुंदर- आकर्षक

Make up Tips: मेकअप करताना या काही छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवा. तुम्ही आहात त्या वयापेक्षा अधिक तरुण आणि सुंदर दिसाल. (How to look more young and beautiful)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2024 09:23 AM2024-03-31T09:23:44+5:302024-03-31T09:25:02+5:30

Make up Tips: मेकअप करताना या काही छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवा. तुम्ही आहात त्या वयापेक्षा अधिक तरुण आणि सुंदर दिसाल. (How to look more young and beautiful)

How to look more young and beautiful than our real age, Make up tips for looking young and smart, 6 makeup tips to make you look younger than your age | खऱ्याखुऱ्या वयापेक्षा अधिक तरुण दिसण्यासाठी ६ मेकअप टिप्स, दिसाल जास्त सुंदर- आकर्षक

खऱ्याखुऱ्या वयापेक्षा अधिक तरुण दिसण्यासाठी ६ मेकअप टिप्स, दिसाल जास्त सुंदर- आकर्षक

Highlightsवय लपविण्यासाठी मेकअप कसा करायचा, ते पाहा...

चेहऱ्याचं रंग- रूप बदलून आपलं व्यक्तिमत्व आणखी खुलविण्याचं कसब मेकअपमध्ये असतं. त्यासाठी फक्त मेकअप उत्तम पद्धतीने कसा करावा, हे तुम्हाला माहिती हवं. आपण बऱ्याचदा पाहतो की आपल्या सभोवतालच्या काही मैत्रिणी खूप छान पद्धतीने मेकअप करतात. त्यामुळे मेकअप केल्यानंतर त्या खरोखरच आहे त्या वयापेक्षा कमी वयाच्या दिसू लागतात (Make up tips for looking young and smart). बहुतांश अभिनेत्रींच्या बाबतीतही तसंच असतं. म्हणूनच वय लपविण्यासाठी मेकअप कसा करायचा, ते पाहा... (6 makeup tips to make you look younger than your age)

 

वय लपविण्यासाठी कसा करायचा मेकअप?

आहोत त्या वयापेक्षा अधिक तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी कशा पद्धतीने मेकअप करावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ fashion_fitness_by_dimpy या पेजवर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये सांगितलेल्या ६ टिप्स पुढीलप्रमाणे-

लग्न- समारंभात गळ्यात हवाच असा ठसठशीत मोत्याचा दागिना, बघा तन्मणीचे ८ मनमोहक डिझाईन्स...

१. आयशॅडो खूप डार्क किंवा व्हायब्रंट शेडमध्ये लावणं टाळा. त्याऐवजी न्यूड शेड किंवा लाईट शेडचे आयशॅडो लावा. 

२. मोठी टिकली लावली की तुम्ही अधिक प्रौढ वाटता. त्यामुळे टिकली अगदी नाजूक लावा. मोठी टिकली लावणं टाळा. 

३. ग्लॉसी, डार्क आणि ब्राईट शेडच्या लिपस्टिक लावणं टाळा. त्याऐवजी मॅट, न्यूड किंवा लाईट शेडच्या लिपस्टिक लावा. तुम्ही अधिक सुंदर आकर्षक दिसाल.

 

४. आय लायनर आणि काजळ हे दोन्हीही तुम्ही खूप जाड किंवा ब्रॉड, डार्क लावत असाल तर असं करणं टाळा. फक्त लायनर लावा किंवा मग नुसतं काजळ लावा. दोन्हीही लावलं की चेहरा अधिक प्रौढ वाटतो.

फुलझाडांवर मावा पडला? बघा १ सोपा घरगुती उपाय, किड निघून जाईल- रोपं पुन्हा बहरतील

५. आहोत त्या वयापेक्षा अधिक तरुण दिसण्यासाठी किंवा वय लपविण्यासाठी ब्लश नेहमी पिंक किंवा न्यूड शेडचं लावा. 

६. आयब्रो फिलिंग करायला विसरू नका. हलक्या शेडमध्ये केलेलं आयब्रो फिलिंग तुम्हाला अधिक स्मार्ट आणि यंग लूक देईल. 

 

Web Title: How to look more young and beautiful than our real age, Make up tips for looking young and smart, 6 makeup tips to make you look younger than your age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.