हिवाळ्याचे दिवस आता सुरु झालेले आहेत. त्याचा परिणाम लगेच आपल्या त्वचेवर दिसायला लागला आहे. त्वचा थोडी रखरखीत होते आहे.. त्वचेतला ओलावा कमी होऊन ती कोरडी पडल्यासारखी वाटू लागते. तसेच बऱ्याचदा तर आपण अंगावर कुठेही खाजवलं तर तिथे लगेच ती भुरकट पडल्यासारखी वाटते. अशावेळी त्वचेला फक्त मॉईश्चरायझर लावून उपयोग नसतो. तर तिला नियमितपणे तेलाने मालिश करण्याचीही खूप गरज असते (home hacks for dry skin in winter). म्हणूनच अशावेळी कोणतं तेल वापरावं आणि कशा पद्धतीने त्वचेची काळजी घ्यावी ते पाहूया..(how to keep skin soft in winter?)
हिवाळ्यात कोणत्या तेलाने त्वचेला मालिश करावी?
तिळाचं तेल, मोहरीचं तेल उबदार असतं असं मानलं जातं. त्यामुळे या दोन्हींपैकी कोणतंही एक तेल वापरून आपण त्वचेला मालिश केली तर त्याचे जास्त चांगले फायदे दिसून येतात.
१. याविषयीचा एक उपाय mirror_salon_academy_nashik या इंस्टाग्राम पेजवरही सुचविण्यात आलेला आहे. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की एका काचेच्या बरणीमध्ये तिळाचं तेल घ्या. त्यामध्ये हळद, मंजिष्टा, वेटीवर, त्रिफळ, कडुलिंबाची पावडर, चंदन पावडर टाका. आता बरणीचं झाकण लावून ती ५ ते ६ दिवस उन्हामध्ये राहू द्या. यानंतर या तेलाने आंघोळीला जाण्याच्या आधी अंगाला मालिश करा. त्वचा छान मऊ होईल.
२. हिवाळ्याच्या दिवसांत अनेकांचा सांधेदुखीचा त्रास खूप वाढतो. तो कमी करण्यासाठी मोहरीचं तेल उपयुक्त ठरतं. यासाठी मोहरीच्या तेलामध्ये काही लसूण पाकळ्या ठेचून घाला.
पोहे खाल्ल्यानंतर ॲसिडीटी होते? पोहे करताना २ टिप्स लक्षात ठेवा, ॲसिडीटी अजिबात होणार नाही
आता हे तेल उकळायला ठेवा. ३ ते ४ मिनिटांनी गॅस बंद करा. यानंतर ते तेल जेव्हा कोमट होईल तेव्हा त्याने अंगाला मालिश करा. अंग मोकळं होऊन फ्रेश वाटेल.
३. आपल्या नेहमीच्या खोबरेल तेलामध्ये कापूर घालून त्वचेला मालिश केल्यानेही त्वचा छान मऊ, कोमल राहण्यास मदत होते.
Web Summary : Winter dryness needs oil massage, not just moisturizer. Sesame or mustard oil are good choices. For extra care, infuse sesame oil with herbs. Mustard oil with garlic helps joint pain. Coconut oil with camphor softens skin.
Web Summary : सर्दियों में रूखी त्वचा के लिए सिर्फ मॉइस्चराइजर नहीं, तेल मालिश जरूरी है। तिल या सरसों का तेल अच्छा विकल्प हैं। अतिरिक्त देखभाल के लिए, तिल के तेल में जड़ी-बूटियाँ मिलाएं। लहसुन के साथ सरसों का तेल जोड़ों के दर्द में मदद करता है। कपूर के साथ नारियल का तेल त्वचा को मुलायम बनाता है।