हिवाळा सुरु झाला की आरोग्याच्या तक्रारी डोकं वर काढतात. त्वचा कोरडी पडणे, केसगळती वाढणे, अंगावरची कोरडी त्वचा, ओठ फाटणे, हात-पाय रखरखीत होणे हे तर नेहमीचेच.(winter foot care tips) पण सगळ्यात जास्त त्रासदायक पायांना भेगा पडणे.(cracked heels remedy) दिवसभर काम करणाऱ्या महिलांना, पायावर जास्त भार येणाऱ्या पुरुषांना आणि साखर-थायरॉइड असलेल्या लोकांना हा त्रास अधिक जाणवतो.(heel cracks treatment) टाचांमधील भेगा सुरुवातीला कोरड्या पडतात. पण दुर्लक्ष केलं की त्या वेदनादायक होतात. चालताना टोचतात तर अचानक रक्तस्त्राव देखील त्यातून होऊ लागतो.
हिवाळ्यात भेगा पडलेल्या टाचांकडे आपण सहज दुर्लक्ष करतो. तळव्याला भेगा पडून पाय दुखतात, इन्फेक्शनचा त्रास सतावतो. पायांच्या भेगांमध्ये माती साचल्यास संसर्गाचा धोका देखील वाढतो. अशावेळी काही घरगुती उपाय नक्की ट्राय करुन बघा.
स्वयंपाकघरातील पिवळे दाणे तेलात मिसळा, आठवड्यातून ३ वेळा केसांना लावा- सगळ्याच तक्रारी होतील गायब!
थंड हवेमुळे टाचांना भेगा पडतात. यासाठी अनेकजण आपल्या पायांवर लोशन लावतात. पण पायांवर हवा तसा फरक दिसून येत नाही. पण घरगुती लोशन लावल्यास फायदा नक्की मिळेल. यासाठी आपल्याला मेणबत्ती, नारळाचे तेल, ग्लिसरीन, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि कोरफडीचा गर लागेल. यानंतर आपल्याला सगळ्यात आधी एक पॅन घेऊन त्यात नारळाचे तेल गरम करा. त्यात मेणबत्ती वितळवून घ्या. मेणबत्तीमधील धागा बाजूला काढून घ्या. यात ग्लिसरीन घाला. चांगले मिसळल्यानंतर त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला.
यात आपण कोरफडीचा गर घाला. मिश्रण थोडसे क्रीमी टेक्सचर येईपर्यंत ढवळा. नंतर काचेच्या बाटलीत भरा. आपले क्रीम तयार होईल. भेगा पडलेल्या टाचांसाठी आपण हे क्रीम रात्री झोपताना लावू शकतो. बरेचदा आपण पायांची नीट काळजी घेत नाही. ज्यामुळे आपल्याला त्रास होतो. पायांची नियमित काळजी घेतल्यास हिवाळ्यातील ही त्रासदायक समस्या सहज नियंत्रणात येऊ शकते.
