Lokmat Sakhi >Beauty > टाचांच्या भेगा खूप वाढल्या, चालताना दुखते? ग्लिसरीनमध्ये मिसळून लावा १ पदार्थ- टाचा होतील मऊ

टाचांच्या भेगा खूप वाढल्या, चालताना दुखते? ग्लिसरीनमध्ये मिसळून लावा १ पदार्थ- टाचा होतील मऊ

cracked heels remedy: glycerin for cracked heels: home remedies for cracked heels: टाचांना भेगा पडल्या असतील, त्वचा कोरडी झाली असेल तर हा सोपा उपाय करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2025 12:32 IST2025-09-21T12:31:36+5:302025-09-21T12:32:43+5:30

cracked heels remedy: glycerin for cracked heels: home remedies for cracked heels: टाचांना भेगा पडल्या असतील, त्वचा कोरडी झाली असेल तर हा सोपा उपाय करुन पाहा.

how to heal cracked heels naturally at Home glycerin and natural ingredient for soft heels best home remedy for painful cracked heels | टाचांच्या भेगा खूप वाढल्या, चालताना दुखते? ग्लिसरीनमध्ये मिसळून लावा १ पदार्थ- टाचा होतील मऊ

टाचांच्या भेगा खूप वाढल्या, चालताना दुखते? ग्लिसरीनमध्ये मिसळून लावा १ पदार्थ- टाचा होतील मऊ

ऋतू बदलला की, आपल्याला त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्वचा काळी पडणे, जळजळ होणे, आग होणे आणि टाचांच्या भेगा वाढणं या समस्या वाढतात. टाचांची व्यवस्थित काळजी न घेतल्यास त्वचा कोरडी पडते. सुरुवातीला हा त्रास आपल्याला इतका त्रास होत नाही.(cracked heels remedy) पण हळूहळू चालणं देखील त्रासदायक होतं. चालताना वेदना होतात, कधी कधी भेगांमधून रक्त येतं, संसर्ग होतो आणि यामुळे पाय दुखू लागतात. (glycerin for cracked heels)
टाचांना भेगा पडण्याची अनेक कारणं आहेत. सतत पाणी, धूळ, माती किंवा योग्य चप्पल न घातल्यास त्वचा कोरडी पडते.(home remedies for cracked heels) तसेच शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ई, सी किंवा आयर्नची कमतरता होते. थंड पाण्याने वारंवार पाय धुणं आणि पायांना मॉइश्चरायझर न लावल्यामुळे ही समस्या अधिक वाढते.(foot care tips) जर आपल्यालाही हा त्रास वारंवार होत असेल तर ग्लिसरीनमध्ये हा पदार्थ मिसळून लावल्यास टाचा मऊ होण्यास मदत होईल. (diy foot care for dry and cracked heels)

ग्लिसरीन त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवते. ज्यामुळे त्वचा हायड्रेटेड आणि लवचिक राहते. यात त्वचेतील ओलावा बाहेर जाण्यापासून रोखणारे घटक असतात. आपल्या कोरड्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम ग्लिसरीन करते.  भेगा पडलेल्या टाचांसाटी ग्लिसरीन आणि मेण वापरण्याचे अनेक मार्ग आहेत. हे एकत्र मिक्स करुन पायांना लावू शकता. ज्यामुळे टाचांच्या भेगा भरुन निघतील. 

Navratri Alata Designs : नवरात्रीत पायाला लावा 'आलता', ५ सुंदर डिझाईन्स- पाहा पारंपरिक पद्धत

याचा मास्क बनवण्यासाठी आपल्याला डबल बॉयलर भांड्यात पॅराफिन मेळ वितळवावे लागेल. मेण वितळल्यानंतर त्यात टी ट्री ऑइल आणि ग्लिसरीन घालून चांगले मिसळा. मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर वापरु शकता. हे वापरण्याआधी आपल्याला पाय कोमट पाण्यात १० ते १५ मिनिटे भिजवा. हवं असल्यास पाण्यात आपण मीठ देखील घालू शकतो. त्यानंतर पायांची मृत त्वचा आपल्याला काढावी लागेल. नंतर तयार मिश्रण टाचांवर लावा. आता पाय प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळा किंवा कापसाचे मोजे घालून रात्रभर हे ठेवा. दुसऱ्या दिवशी पाय कोमट पाण्याने धुवा. त्वचा काही प्रमाणात मऊ झाली असेल. हा उपाय आपण आठवड्यातून १ ते २ वेळा करु शकतो. 
 

Web Title: how to heal cracked heels naturally at Home glycerin and natural ingredient for soft heels best home remedy for painful cracked heels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.