थंडीच्या दिवसांत हातापायांना भेगा पडणं (How to heal cracked heels & hands in winters) तसेच त्वचा कोरडी पडण्याची समस्या सतावते. त्वचेच्या बाबतीत हिवाळा अतिशय त्रासदायक असून थंडीच्या दिवसात त्वचेचा संपूर्ण पोतच खराब होतो. त्वचा खूपच रुक्ष आणि कोरडी दिसू लागते. तरुण वयातही हात, पाय अक्षरश: सुरकुतलेले (Effective Home Remedy to Heal Cracked Heels & Hands) दिसू लागतात. यासोबतच सगळ्यात वाईट अवस्था होते ती हातापायांची. भेगाळलेले, कोरडे झालेले हातपाय तर चारचौघात खूपच लाज आणतात. हातपाय भेगा पडून सुरकुतलेले असल्याने त्वचा खराब तर दिसतेच सोबतच त्वचेचे सौंदर्य देखील हरवले जाते(Remove Cracked Heels By Using Candle Wax).
अनेकदा हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेऊन देखील आपल्या हातापायांची त्वचा सुरकुतलेली कोरडी, रुक्ष, निस्तेज दिसते. हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण हॅन्डग्लोव्ह्ज किंवा पायात सॉक्स घातले तरीही त्वचा भेगा पडून सोलवटली जाते. वातावरणातील गारठ्याने त्वचा सोलवटली जाऊन हळूहळू पांढरी पडू लागते. थंडीच्या दिवसांत त्वचेला मॉइश्चराइज करणे गरजेचे असते. जर त्वचा वेळीच योग्य पद्धतीने मॉइश्चराइज (How to care for dry, cracked heels & hands) केली तर हिवाळ्यात त्वचेला भेगा पडण्याचा आणि त्वचा कोरडी, रुक्ष, निस्तेज होण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
साहित्य :-
१. पेट्रोलियम जेली - १ टेबलस्पून
२. मेण - २ ते ३ टेबलस्पून
३. खोबरेल तेल - १ टेबलस्पून
४. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून
५. व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल - १ कॅप्सूल
हिवाळ्यांत हाता - पायांना भेगा पडल्या तर करा हा खास उपाय...
हिवाळ्यात हातापायांना भेगा - सुरकुत्या पडू नये म्हणून एक खास घरगुती उपाय snehasinghi1 या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. हा उपाय नेमका काय आहे ते पाहूयात. हिवाळ्यात हातापायांची त्वचा फुटून भेगा पडू नये यासाठी घरगुती उपाय नेमका काय आहे आणि तो कसा करावा ते पाहूयात.
कॉमेडियन भारती सिंह सांगते, केस काळे करण्याचा सुपरहिट फॉर्म्युला, पांढऱ्या केसांची चिंताच सोडा....
खोबरेल तेलात मिसळा किचनमधील २ सिक्रेट पदार्थ, केसांच्या अनेक समस्यांवर एकच असरदार सोल्युशन...
काय आहे हा असरदार घरगुती उपाय...
सगळ्यात आधी एका मोठ्या काचेच्या बाऊलमध्ये मेण घेऊन त्याचे छोटे छोटे तुकडे करुन घ्यावेत. आता या मेणाच्या तुकड्यात १ टेबलस्पून पेट्रोलियम जेली, ३ ते ५ टेबलस्पून खोबरेल तेल, आणि व्हिटॅमिन 'ई' ची कॅप्सूल फोडून घालावी. आता एका मोठ्या खोलगट कढईत पाणी घेऊन ते पाणी चांगले उकळवून घ्यावे. या उकळवून घेतलेल्या गरम पाण्यांत सगळे मिश्रण एकजीव केलेला काचेचा बाऊल ठेवावा. आणि सगळे मिश्रण संपूर्णपणे वितळवून घ्यावे. मिश्रण थोडे वितळत आल्यावर त्यात १ टेबलस्पून बेकिंग सोडा घालावा. मिश्रण संपूर्णपणे वितळवून झाल्यावर आपले हात - तळपाय स्वच्छ धुवून पुसून कोरडे करुन घ्यावेत.
फक्त एक चमचाभर चहा पावडरच्या पाण्याने केसांच्या समस्या होतील दूर, 'असा' करा उपयोग...
आता हात आणि तळपायांवर एका जुन्या ब्रशच्या मदतीने हे मिश्रण थोडे कोमट झाल्यावर पसरवून लावून घ्यावे. १५ ते २० मिनिटे तळपायांवर हे मिश्रण असेच लावून ठेवावे. मिश्रण संपूर्णपणे सुकल्यावर चमचा किंवा सुरीच्या मदतीने हे हात आणि तळपायांवरचे मिश्रण खरवडून काढून घ्यावे. मग हातात हँडग्लोव्ह्ज आणि पायांत सॉक्स घालूंन झोपावे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या हातापायांच्या त्वचेत अधिक फरक जाणवेल. आठवड्यातून किमान २ वेळा तरी हा उपाय करावा. यामुळे हिवाळ्यात हातापायांची फुटलेली त्वचा पुन्हा पहिल्यासारख्या दिसू लागेल. अशाप्रकारे आपण हातापायांच्या त्वचेला भेगा पडू नये म्हणून हा घरगुती सोपा मेणाचा उपाय करू शकतो.