Lokmat Sakhi >Beauty > उन्हाळ्यात तुळस सुकली-नवीन पानंच येईना? कुंडीत 'हा' पदार्थ मिसळा; आठवडाभरातच तुळस होईल हिरवीगार

उन्हाळ्यात तुळस सुकली-नवीन पानंच येईना? कुंडीत 'हा' पदार्थ मिसळा; आठवडाभरातच तुळस होईल हिरवीगार

How To Grow Tulsi At Home : उन्हाळ्यात तुळशीची कशी काळजी घ्याल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 02:16 PM2024-05-24T14:16:17+5:302024-05-24T14:31:35+5:30

How To Grow Tulsi At Home : उन्हाळ्यात तुळशीची कशी काळजी घ्याल?

How To Grow Tulsi At Home : How To Grow Basil Plant At Home | उन्हाळ्यात तुळस सुकली-नवीन पानंच येईना? कुंडीत 'हा' पदार्थ मिसळा; आठवडाभरातच तुळस होईल हिरवीगार

उन्हाळ्यात तुळस सुकली-नवीन पानंच येईना? कुंडीत 'हा' पदार्थ मिसळा; आठवडाभरातच तुळस होईल हिरवीगार

भारतात  प्रत्येक घरात तुळस ठेवली जातात. हिंदू संस्कृतीत तुळशीचे धार्मिक महत्व फार आहे. याशिवाय तुळशीतील गुणकारी औषधी गुणधर्मांमुळे तुळस मोठ्या प्रमाणात सौदर्यं उत्पादनांमध्ये आणि औषधांमध्ये वापरली जाते. (Gardening Tips)  उन्हाळ्यात तुळस सुकते, पानं गळतात किंवा पानं पिवळी पडतात अशी अनेकांची तक्रार असते. (How To Grow Basil Plant At Home) 

तुळशीचं रोप का सुकते?

तुळशीचे रोप सुकण्यामागे अनेक कारणं असू शकतात.  ज्यात गरजेपेक्षा जास्त पाणी देणं, खत घालणं, रोप कमी उन्हात ठेवणं याचा समावेश आहे.  याव्यतिरिक्त किडे लागण्यामुळेही तुळशीचं रोप सुकतं. तुळशीच्या रोपाला हिरवंगार ठेवण्यासाठी जास्त वेळ देण्याची गरज असते. (How To Grow And Care For Basil Indoors)

तुळशीचे रोप पुन्हा बहरलेलं ठेवण्यासाठी तुम्ही शेण किंवा कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकता.  सगळ्यात आधी शेण व्यवस्थित सुकवून घ्या त्यानंतर चुरा बनवून ही झाडं मातीत  घाला. कडुलिंबाची पानं व्यवसस्थित सुकवून याची पावडर बनवून मातीत घाला. यातील पोषक तत्व मुळांपर्यंत पोहोचतात. (How To Grow Basil In Your Kitchen)

तुळशीत किती पाणी घालावं?

जर नेहमी घरात तुळशीचं रोप ठेवायचं असेल तर यात योग्य प्रमाणात पाणी घाला. जेणेकरून पुन्हा पाणी घालात तेव्हा माती पूर्ण सुकणार नाही. पावसाळ्याच्या दिवसांत रोपाला पाणी घालण्याचे प्रमाण कमी व्हायला हवे.  तुळशीच्या चांगल्या वाढीसाठी ६ ते ८ तासांच्या उन्हाची आवश्यकता असते. अशा स्थितीत तुळस खुल्या ठिकाणी ठेवायला हवी. जेणेकरून ऊन योग्य प्रमाणात मिळेल. आठवड्यातून एकदा तुळशीच्या रोपाची छाटणी करा, कुंडी बदलताना मुळं सावधगिरीने काढा. पानांमध्ये छिद्र दिसल्यानंतर पाणी आणि १ चमचा डिश लिक्विड घालून पेस्ट कंट्रोल करा.

तुळशीच्या रोपाला किटकांपासून कसे वाचवावे?

जर तुळशीच्या रोपाला किडे लागले असतील तर तुम्ही कडुलिंबाचा ऑईल स्प्रे करू शकता. एक लीटर पाण्यात १० थेंब हा स्प्रे घाला. तुळशीच्या पानांवर व्यवस्थित स्प्रे करा. ज्यामुळे समस्या कमी होण्यास मदत होईल. तुळशीच्या रोपाला नवीन बीया येत असील तर त्या काढून घ्या.

तुळशीच्या मंजिऱ्या सुकवून बी वाळवा. मंजिऱ्या काढल्या की तुळशीला नवीन पालवी छान फुटते.
 

Web Title: How To Grow Tulsi At Home : How To Grow Basil Plant At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.