Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयब्रोजचे केस विरळ झाले-भुवयांना ना आकारउकार? 'हे' नॅचरल जेल लावा-भुवया होतील दाट सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2026 15:26 IST

natural eyebrow gel: grow thicker eyebrows: home remedy for eyebrows: जेल आपल्या भुवयांना योग्य आकार देत नाही तर केस नैसर्गिकरित्या दाट करण्यासही मदत करतात.

सुंदर आणि रेखीव भुवया आपल्या डोळ्यांचे सौंदर्य तर वाढवतातच, पण चेहऱ्याला शार्प लूकही देतात. पण वाढते प्रदूषण, चुकीचा आहार आणि सततच्या आयब्रो पेन्सिलच्या वापरामुळे अनेकींच्या भुवयांचे केस विरळ होतात. (natural eyebrow gel)कुणाचा शेप नीट नसतो, तर कुणाच्या भुवया इतक्या फिकट असतात की चेहऱ्याचा उठावच निघून जातो. यावर उपाय म्हणून अनेकजण पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट्स घेतात किंवा दर महिन्याला थ्रेडिंग करतात.(grow thicker eyebrows)पार्लरमध्ये गेल्यानंतर आयब्रो करताना चेहरा लाल होतो, भुवया सुजतात. अनेकदा जखम देखील होते. पण घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यांनी आपण मॅजिक आयब्रो जेल तयार करु शकतो. हा जेल आपल्या भुवयांना योग्य आकार देत नाही तर केस नैसर्गिकरित्या दाट करण्यासही मदत करतात. (home remedy for eyebrows)

उन्हामुळे चेहरा काळवंडला- ब्लॅक स्पॉट्स? इवलासा बिटाचा तुकडा करतो जादू- १० मिनिटांत मिळेल त्वचेला सोन्यासारखी चमक

हे जेल बनवण्यासाठी आपल्याला तीन गोष्टींची गरज लागेल. कोरफड जेल - २ चमचे, एरंडेल तेल - अर्धा चमचा, व्हिटॅमिन ई कॅप्सूल- १. आता आपल्याला एका लहान वाटीत किंवा डबीमध्ये कोरफड जेल घ्या, त्यात एरंडेल तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या, जोपर्यंत जेलसारखे दिसत नाही. होममेड आयब्रो जेल तयार होईल. 

झोपण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ धुवा. जुन्या मस्करा ब्रशने किंवा बोटांच्या साहाय्याने हे जेल भुवयांवर लावा. केसांच्या वाढीच्या दिशेने मसाज केल्यास भुवया दाट होण्यास मदत होईल. आपल्याला बाहेर जायचे असेल आणि भुवया विरळ दिसत असतील तर जेल लावून मस्करा ब्रशने भुवया वरच्या दिशेने विंचरा. यामुळे भुवयांना नॅचरल आणि परफेक्ट लिफ्टेड लूक मिळेल.

एरंडेल तेलात फॅटी अॅसिड्स असतात. जे आपल्या केसांच्या मुळांना वाढण्यास आणि भुवया दाट करण्यास मदत करतात. बाजारातील महागड्या आयब्रो फिक्सर ऐवजी कोरफड जेल वापरा. यामुळे केस दिवसभर तसेच राहतात.नियमितपणे १५ ते २० दिवस हा उपाय केल्यास आपल्या भुवयांच्या घनतेमध्ये आणि आकारात फरक दिसू लागतो. आपल्याला भुवया जाड हव्या असतील, तर या जेलमध्ये आपण थोडीशी 'कोको पावडर' देखील मिसळू शकता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Get Thicker Eyebrows Naturally: Homemade Gel for Beautiful, Defined Brows

Web Summary : Thinning eyebrows? This natural DIY gel, using aloe vera, castor oil, and vitamin E, promises thicker, shapelier brows. Apply nightly for noticeable results. Skip harsh parlor treatments!
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी