बारीक, पातळ केसांना लांब, दाट करण्यासाठी आपण अनेक केअर उत्पादनांचा वापर करतो. पण तरीही हवातसा रिजल्ट मिळत नाही. गरजेपेक्षा जास्त केमिकल्सचा वापर करणं केसांसाठी नुकसानकारक ठरू शकतं. (How To Grow My Hair Length) काही घरगुती उपाय करून तुम्ही नैसर्गिकरित्या सुंदर केस मिळवू शकता. योगा प्रशिक्षक कैलास बिश्नोई यांनी एका असरदार उपायाबाबत सांगितले आहे.
योग गुरू सांगतात की काही मसाले पाण्यात उकळून त्याचे सेवन केल्यास तब्येतीवर चांगला परिणाम दिसून येईल. अभिनेत्री अनुष्का शर्मानंही हा उपाय लाईक केला आहे. हा उपाय आणि त्याचे फायदे समजून घेऊ. (How To Grow My Hair Length Try Effective Remedy Shared By Yoga Instructor Kailash Bishnoi)
केस वाढवण्यासाठी असरदार उपाय
जेव्हा आपल्या केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळत नाही तेव्हा केस गळणं, केस कमकुवत होणं सुरू होतं. केसांना खाण्यापिण्यासोबत केसांना पोषण देणंही फार महत्वाचे आहे. यासाठी योग गरू कैलास बिश्नोई यांनी एक उपाय सांगितला आहे. ज्यामुळे केसांना पोषण मिळते. यासाठी योग गुरू कैलाश बिश्नोई यांनी एक असरदार उपाय सांगितला आहे. ज्यामुळे केस हेल्दी राहतील आणि केसांची वाढ होईल.
हा उपाय करण्यासाठी लागणारं साहित्य
१) पाणी - ग्लास
२) चहा पावडर - १ चमचा
३) मेथी - १ चमचा
४) लवंग - ४ ते ५
५) तेजपत्ता - १
ओटीपोट सुटलं, मागचा भागही वाढला? ‘हा’ चिमूटभर मसाला पाण्यात मिसळून प्या, स्लिम-फिट दिसाल
केस वाढवण्यासाठी असा करा उपाय
सगळ्यात आधी एक कढई घ्या. त्यात १ ग्लास पाणी घालून गरम करायला ठेवा. जेव्हा पाणी गरम होईल तेव्हा त्यात मेथी, लवंग, तेजपत्ता घालून व्यवस्थित उकळवून घ्या. सर्व साहित्य व्यवस्थित शिजल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवून द्या. थंड झाल्यानंतर गाळून हे पाणी बॉटलमध्ये भरून ठेवा. हे जादूई पाणी स्काल्पला लावून तुम्ही मसाज करू शकता काही दिवसातंच तुमचे केस लांबसडक, दाट होतील.
आरोग्याबाबत बोलायचे झाले तर मेथीचे दाणे केसांसाठी बरेच फायदेशीर ठरतात. यात प्रोटीन्स, व्हिटामीन, फॉलिक एसिड आणि वेगवेगळी पोषक तत्व असतात ज्यामुळे केस हेल्दी राहतात. याशिवाय यात एंटी ऑक्सिडेंट्स, एंटी फंगल, एंटी बॅक्टेरिअल गुण असतात.
वयाच्या साठीतही मिलिंद सोमण दिसतात हॉट, प्रोटीनसाठी खातात घरी बनवलेला ‘हा’ पदार्थ
ज्यामुळे खाज, फोड येणं, एलर्जीच्या समस्या उद्भवत नाहीत. ज्या महिलांना केसांना मेहेंदी लावतात त्या चहा पावडरमध्ये पाणी मिसळतात. ज्यामुळे केस काळे होतात आणि केसांना नैसर्गिक शाईन येते. म्हणूनच योग गुरू यांनी सांगितलेला हा उपाय केल्यास केस लांबसडक आणि काळे होतील.