वाढत्या वयात बऱ्याच महिलांचे केस पातळ होतात. कितीही प्रयत्न करूनही पुन्हा हवेतसे जाड केस मिळवता येत नाहीत (How To Grow Hairs Naturally). ज्यांचे केस खूपच पातळ असतील तसंच गळतंही असतील ते काही घरगुती उपाय करून पुन्हा लांबसडक, दाट केस मिळवू शकतात. केसांसाठी कोणते घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. (5 Home Remedies For Hair Growth)
जवसाची पेस्ट
केसांना जवसाची पेस्ट लावणं फायदेशीर ठरतं. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन ई, ओमेगा-३ फॅटी एसिड्स आणि एंटी ऑक्सिड्ंट्स असतात. ही पोषक तत्व केसांचे वॉल्यूम वाढवण्यास आणि केसांना नैसर्गिक शाईन देण्यास मदत करतात. हा उपाय करण्यासाठी २४ तास पाण्यात भिजवलेले २ चमचे जवस मिक्सरमध्ये वाटून घ्या (Ref). त्यानंतर ३ चमचे दही घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर १ तास केस सुकल्यानंतर हेअर वॉश करा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास केसांच्या आरोग्यात सुधारणा झालेली दिसून येईल.
मोहोरी आणि लसणाचं तेल
जर तुम्हाला केसांची मुळं मजबूत घट्ट करायची असतील तर तुम्ही १ वाटी मोहोरीच्या तेलात ३ ते ४ पाकळ्या लसूण घालून गॅसवर ठेवा. ५ मिनिटं शिजवा मग गॅस बंद करून तेल थंड झाल्यावर एका बरणीत काढून घ्या. जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ते केसांना लावा. यामुळे केस मजबूत दिसण्यास मदत होईल.
आल्याचा रस
केसांचं गळणं थांबवण्यासाठी तुम्ही आल्याचा रस वापरू शकता. नारळाच्या तेलात आल्याचा रस मिसळून लावल्यानं स्काल्पवर जळजळ किंवा रेडनेस होणार नाही. हा रस लावल्यानंतर २० मिनिटांनंतर हेअर वॉश करून घ्या.
जास्वंदाच्या फुलाची पेस्ट
जास्वंदात अनेक औषधी गुणधर्म असतात जे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. एक वाटी जास्वंदाची फुलं आणि अर्धी वाटी पानं घेऊन मिक्सरमध्ये घालून २ ते ३ चमचे पाण्यासोबत मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट हेअर मास्कप्रमाणे ३० मिनिटं ठेवून नंतर शॅम्पूनं केस धुवा.
कांद्याचा रस
केसांसाठी कांदा खूपच गुणकारी ठरतो. कांद्याचा रस केसांना लावून ठेवा नंतर थोड्या वेळानं स्वच्छ पाण्यानं केस धुवा. यामुळे केस दाट होण्यास मदत होईल आणि केसांची लेंथही वाढेल.
