वातावरणातील बदलांबरोबरच त्वचा आणि केसांमध्येही बदल होतात. कधी केस गळतात तर कधी खूपच पातळ होतात. केसांच्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. केस गळणं, केस कोरडे पडणं, केस पातळ होणं, कोंडा यांसारख्या समस्या टाळण्यासाठी लोक वेगवेगळे केमिकल्सयुक्त उत्पादनं वापरतात. (Hair Care tips Hair Care Tips Use These 3 Kitchen Ingredients For Hair Growth)
कंटेंट किएटर संचिता मित्रानं आपल्या अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या सुरूवातीला त्यांनी सांगितले की केस वाढत नसतील तर तुम्ही हा घरगुती उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. हे तेल तयार करण्यासाठी तुम्हाला नैसर्गिक वस्तूंची आवश्यकता असेल. (How To Grow Hairs Faster)
नारळाचं तेल, रोजमेरीची पानं, मेथी दाणे, कॅस्टर ऑईल, व्हिटामीन ई कॅप्सूल हे साहित्य लागेल. हा घरगुती उपाय करण्यासाठी २ चमचे मेथी आणि २ चमचे रोजमेरीची पानं घ्या त्यात अर्धा कप नारळाचं तेल घालून रात्रभर भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी १० मिनिटांसाठी उकळत्या पाण्यात तेलाचं पातेलं ठेवून गरम करून घ्या. त्यात २ चमचे एरंडेल तेल आणि ३ ते ४ चमचे व्हिटामीन ई कॅप्सूल मिसळा. हे मिश्रण गाळून घेतल्यानंतर तुमचं तेल तयार होईल. रात्री झोपण्याच्या आधी स्काल्पला या तेलानं मालिश करा सकाळी केस स्वच्छ धुवा. या पदार्थांचे फायदे समजून घ्या.
नारळाच्या तेलाचे फायदे
नारळाचे तेल स्किन बरोबरच केसांनाही पोषण देते. हे तेल केसांसाठी एका नॅच्युरल कंडिशनरप्रमाणे काम करते. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. याशिवाय केस सॉफ्ट, ग्लोईंग, फ्रिज फ्री होतात. नारळाच्या तेलात फॅटी एसिड्स असतात ज्यामुळे केसाचं डॅमेज रोखता येतं.
रोजमेरीचे फायदे
रोजमेरीची पानं केस वाढवण्यासाठी उत्तम ठरतात. यामुळे स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. केसांच्या मुळांना पोषण मिळतं. रोजमेरी हेअर फॉल रोखण्यास मदत करते. याशिवाय नवीन केस उगवणंही सोपं होतं. नियमित याच्या वापरानं केसांचे आरोग्य चांगले राहते याशिवाय केसांचा रंगही सुधारतो.
गुलाबाची पानं पिवळी होतात-फुलंच येत नाही? १ खास ट्रिक, लालबुंद गुलाबांनी बहरेल रोप
मेथी दाण्यांचे फायदे
मेथीचे दाणे त्वचा आणि केसांसाठी गुणकारी ठरतात. हे छोटे छोटे दाणे केसांसाठी रामबाण उपाय आहेत. यात प्रोटीन्स आणि निकोटिनिक एसिड असते. ज्यामुळे केस शायनी, मुलायम, दाट होतात.
Web Summary : Combat hair thinning with a homemade oil using coconut oil, rosemary, fenugreek, and castor oil. This blend nourishes the scalp, promotes hair growth, and improves hair health. Regular use can lead to thicker, shinier, and healthier hair.
Web Summary : नारियल तेल, रोजमेरी, मेथी और कैस्टर ऑयल का उपयोग करके घर के बने तेल से बालों के पतलेपन से लड़ें। यह मिश्रण खोपड़ी को पोषण देता है, बालों के विकास को बढ़ावा देता है और बालों के स्वास्थ्य में सुधार करता है। नियमित उपयोग से बाल घने, चमकदार और स्वस्थ हो सकते हैं।