आजकाल केस गळण्याची समस्या अनेकांना उद्भवते. जर वेळीच तुम्ही तुमची लाईफस्टाईल बदलली तर केस गळण्याच्या समस्येवर चांगलं सोल्यूशन मिळू शकतं. बऱ्याच मुलींना लांबसडक, काळे केस हवे असतात त्यासाठी त्या वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं वापरतात.
पांरपारिक घरगुती उपाय तुमचं काम सोपं करू शकतात. यासाठी तुम्हाला फार मेहनत किंवा खर्चही करावा लागणार नाही. केसांसाठी तांदळाचं पाणी वरदान ठरू शकतं फक्त तांदळाच्या पाण्याचा वापर कसा करायचा हे समजू घेऊ. (How To Grow Hair Faster Using Rice Water)
तांदळाच्या पाण्याचा उपाय
लांब केसांसाठी बाजारात बरीच उत्पादनं असली तरी काही दिवस परिणाम दिसतो नंतर पुन्हा केस तसेच होतात. केसांची लांबी वाढवण्यासाठी तुम्ही तांदळाचं पाणी वापरू शकता. सर्वाच्याच घरी भात शिजवला जातो. भात शिजवल्यानंतर हे पाणी तुम्ही केसांसाठी वापरू शकता. तांदळाच्या पाण्यात ग्लिसरिन घातल्यास हा उपाय खूपच फायदेशीर ठरेल. तांदळाचं पाणी केसांना लावल्यानं केस चार पटींना जास्त वाढतात. हा नैसर्गिक उपाय केसांना चमकदार आणि लांबसडक बनवण्यास मदत करतो. (Ref)
ऐन पंचविशीत केस पिकले म्हणून डाय काय करता? आवळा कढीपत्त्याचा उपाय-केस होतील काळेभोर
तांदळाचं पाणी केसांसाठी का फायदेशीर?
तांदळाच्या पाण्यात व्हिटामीन बी, ई, इनोसिटॉल आणि एंटी ऑक्सिडेंट्स यांसारखी पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असतत. ज्यामुळे केसांना पोषण मिळतं. तांदळाच्या पाण्यात ग्लिसरीन आणि कडुलिंबाच्या पानांचा रस घातल्यास फायदे दुप्पट मिळतात.
केसांवर तांदळाचा वापर कसा करावा?
हा उपाय करण्यासाठी १०० ग्रॅम तांदूळ अर्धा लीटर पाण्यात ३ तासांसाठी भिजवून ठवा. नंतर तांदळाचं पाणी गरम करून घ्या ज्यामुळे ते अधिक गुणकारी होते. नंतर गाळून शिजलेले तांदूळ आणि पाणी वेगळं करून घ्या. या पाण्यात १ चमचा ग्लिसरिन आणि कडुलिंबाच्या पानांचा रस घालून व्यवस्थित मिसळून घ्या.
चपात्या वातड होतात-फुगत नाही? कणकेत हा पांढरा पदार्थ मिसळा, मऊ-फुगलेल्या होतील चपात्या
हा स्प्रे रोज रात्री झोपण्याआधी केसांना लावा नंतर माईल्ड शॅम्पूनं केस धुवा. आठवड्यातून २ वेळा नियमित केस धुवा. या उपायानं केसांची वाढ चांगली होईल तसंच केस वेगानं वाढतील. याशिवाय केसांवर हिटींग टुल्सचा वापर अजिबात करू नका.
