Eyebrow Home Remedy : चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यात आयब्रो म्हणजेच भुवयांची मोठी भूमिका असते. भुवया जर व्यवस्थित शेपमध्ये आणि दाट असतील तर सौंदर्य आणखी खुलतं. त्यामुळेच दाट आणि चांगल्या भुवया सगळ्यांनाच हव्या असतात. त्यासाठी अनेक महिला किंवा तरूणी केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करतात. पण तरीही हव्या तशा भुवया त्यांना मिळत नाही. एक्सपर्ट सांगतात की, शरीराच्या कोणत्याही भागाचं सौंदर्य हे आतल्या पोषणावर आणि योग्य काळजी घेण्यावर अवलंबून असतं. जसे की डोक्यावरील केसांना पोषणाची गरज असते, तशीच भुवयांनाही योग्य पोषणाची गरज असते.
आयब्रो पातळ का होतात?
भुवया पातळ होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. वय वाढत गेल्यावर शरीरातील टिश्यू आणि विविध प्रणाली नैसर्गिकरित्या कमजोर होतात, त्यामुळे केसांच्या मुळांवरही परिणाम होतो. याशिवाय हार्मोन्समधील बदल, शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता, जास्त ताणतणाव आणि त्वचेच्या समस्या यांमुळेही भुवयांचे केस गळू शकतात किंवा पातळ होऊ शकतात.
आयब्रो दाट कशा कराव्यात?
खोबऱ्याचं तेल केसांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. हे तेल थंड गुणधर्माचे असल्याने त्वचेची जळजळ शांत करतं आणि केसांच्या मुळांना बळकटी देतं. भुवयांवर खोबऱ्याचं तेल लावल्यास ते हळूहळू त्वचेत मुरतं आणि केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे कोरड्या व कमजोर मुळांना ओलावा मिळतो आणि नवीन केस उगवण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होतं.
खोबऱ्याचं तेल आणि लिंबाच्या रसाचे लोशन
खोबऱ्याचं तेल आणि लिंबू या दोन्ही गोष्टी सहजपणे घरात उपलब्ध असतात. आयब्रो जाड आणि दाट करण्यासाठी तुम्ही या दोन्हींचे एक साधे लोशन तयार करू शकता. त्यासाठी १ चमचा खोबऱ्याचं तेल आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब एकत्र मिसळा. हे लोशन रात्री झोपण्यापूर्वी भुवयांवर हलक्या हाताने लावा. नियमित वापर केल्यास भुवयांच्या केसांची वाढ होण्यास मदत होऊ शकते.
