Join us

पंचेचाळीशी नंतरही मुलायम, लांब राहतील केस; डायटिशिअननं सांगितलं मजबूत केसांचं रहस्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:35 IST

Hair Care Home Remedies : खूप जास्त पैसे खर्च न करताही तुम्ही चांगले हेल्दी केस मिळवू शकता असं सिमरत डायटिशिअन सिमरत कथूरिया सांगतात. यासाठी त्यांनी काही नॅचरल उपायही सांगितले आहेत, ज्या त्या स्वत: फॉलो करतात.

Hair Care Home Remedies : लांब, चमकदार, मुलायम आणि दाट केस असावेत असं सगळ्याच तरूणी-महिलांना वाटत असतं. पण ही इच्छा सगळ्यांचीच पूर्ण होते असं नाही. याला कारणं वेगवेगळी असू शकतात. केस हे महिलांच्या सौंदर्यात आणि पर्सनॅलिटीमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. केस जर लांब, चमकदार, मुलायम नसतील, कुरतडल्यासारखे किंवा रफ असतील आत्मविश्वसाही कमी होतो. याच कारणानं तरूणींना हेअर केअर प्रोडक्ट्सची मदत घ्यावी लागते. ज्यासाठी पैसेही भरपूर खर्च केले जातात. मात्र, खूप जास्त पैसे खर्च न करताही तुम्ही चांगले हेल्दी केस मिळवू शकता असं सिमरत डायटिशिअन सिमरत कथूरिया सांगतात. यासाठी त्यांनी काही नॅचरल उपायही सांगितले आहेत, ज्या त्या स्वत: फॉलो करतात.

डायटिशिअन सिमरत यांचं वय ४६ झालं असूनही त्यांचे केस कंबरेपर्यंत लोबंकळतात. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत लांब-दाय, मुलायम केसांचं रहस्य सांगितलं आहे. सिमरत यांनी त्यांच्या डेली रूटीनच्या काही सवयींबाबत सांगितलं. ज्या तुम्हीही फॉलो करू शकता.

मनुका आणि अंजीर भिजवून खा

सिमरत रोज रात्री ३ ते ४ मनुका आणि २ अंजीर भिजवून ठेवतात आणि सकाळी खातात. या गोष्टींमुळे शरीरात आयर्नची लेव्हर सुधारण्यास मदत मिळते. ज्यामुळे केसही मजबूत होतात आणि केसगळती थांबते. डोक्याच्या त्वचेमध्ये ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं आणि यामुळे केसांची मूळं मजबूत होतात.

कढीपत्ता

जर तुम्ही सकाळी कढीपत्त्याचा ज्यूस प्याल किंवा रोज काही पानं खाल किंवा जेवणात टाकून खाल तर तुम्हाला खूप फायदे मिळतील. यानं केराटिन वाढतं, जे केसांना नॅचरली आणि हेल्दी पद्धतीनं वाढवण्यास मदत करतात.

दही खा

केस हेल्दी, मजबूत ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी दही नियमित खाल्लं पाहिजे. रोज दुपारच्या जेवणानंतर दही खावं. यानं पोटाचं आरोग्य चांगलं राहतं आणि बायोटिन मिळतं. हे तत्व केसांसाठी फायदेशीर असतं.

लॅवेंडर टी

जर तुम्ही सांयकाळी नियमितपणे चहा पित असाल तर दुधाच्या चहाऐवजी लॅवेंडर टी पिऊ शकता. लॅवेंडर टी नं केसांसोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात.

प्रोटीनही महत्वाचं

केसांसाठी तुम्ही रोजच्या आहारात प्रोटीनचा देखील समावेश केला पाहिजे. प्रोटीनमुळे शरीरासोबतच केस मजबूत होतात. यानं केस काळे, दाट आणि मजबूत होतात.

एक्सरसाईज

रोज झोपण्याआधी २ एक्सरसाईज करा. पहिला एक्सरसाईज म्हणजे बेडवर झोपून केस खाली एका बाजूनं लोंबकळत ठेवा. यानं डोक्याच्या त्वचेमध्ये ब्लड फ्लो वाढेल आणि केस मजबूत होतील. सोबतच झोपण्याआधी ब्रीदिंग एक्सरसाईज करा. यानं स्ट्रेस कमी होईल आणि केसगळतीही रोखली जाईल. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स