आपला चेहरा सुंदर-छान दिसावा असं प्रत्येकाला वाटतं.(Skin care Tips) पण त्वचेच्या वाढत्या समस्यांमुळे आपल्याला वैताग येतो. चेहऱ्यावर सतत पिंपल्स, मुरुमे येतात, अशावेळी आपण त्यांना हाताने फोडतो. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग येतात, चेहरा निस्तेज होऊ लागतो.(Home remedy for pimple) त्वचेला सुंदर करण्यासाठी आपण महागड्या क्रीम्स वापरतो, अनेकदा काही घरगुती उपाय देखील करतो. परंतु यामुळे त्वचेला काही फायदा होत नाही.( Pimples on face remedy)
त्वचेला जितके बाहेरचे पोषण महत्त्वाचे असते तितकेच आतून देखील हवे असते.(Simple trick for glowing skin) जर आपण योग्य आहार, रासायनिक उत्पादनांचा कमी वापर आणि फेसा योगा केल्यास चेहरा सुंदर होण्यास मदत होईल. तसेच त्वचेवरील पिंपल्स आणि मुरुमे कमी होतील.(Pimples and acne reduction) नियमितपणे फेस योगा केल्यास त्वचेवरील ग्लो वाढेल.(Glowing skin without cream) इंस्टाग्रामवरील ब्रह्मऋषी देवदास यांनी एक व्हिडीओ शेअर केला. त्यांनी त्वचेवर पिंपल्स का येतात? अशावेळी काय करायला हवं याविषयी सांगितलं आहे.(Skin glow tips)
तळपाय रखरखीत झाले- टाचा भेगाळल्या? रश्मिका मंदानासारखे पेडिक्युअर घरच्या घरी, टाचा होतील मऊमुलायम
त्वचेवर पिंपल्स येण्यामागची कारणे पोटातील उष्णता वाढणे, शरीरात वाढलेली आम्लता आणि झोपेचा अभाव याचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर दिसून येतो. तसेच आपण आहारात तेलकट-मसालेदार पदार्थ कमी खायला हवे. इतकेच नाही तर कोणता योगा करायला हवा हे जाणून घेऊया.
चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतील तर तोंडात पाणी भरुन ठेवा. यानंतर ५ ते ६ वेळा चेहरा धुवा. यानंतर तोंडातील पाणी बाहेर फेकून द्या. या पाण्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडण्यास मदत होईल. तसेच मुरुमांच्या समस्यांपासून आपल्याला आराम मिळेल. मुरुमांची समस्या टाळण्यासाठी आपण हा फेस योगा दिवसातून ४ ते ५ मिनिटे करु शकतो. यामुळे चेहरा उजळेल आणि मुरुमांची समस्या टाळता येईल.
जर आपल्या रक्तदाबाची समस्या असेल तर त्यांनी व्यायाम करु नये. यामुळे श्वास घेण्यास अडचणी येतात. तसेच चेहऱ्यावरील रक्ताभिसरण वाढते. या व्यायामामुळे मुरुमे कमी होतात आणि चमक वाढते.