बऱ्याचदा असं होतं की आपलं आपल्या त्वचेकडे व्यवस्थित लक्ष देणं होत नाही. रोजच्या रोज आपल्यामागे कामांची एवढी धावपळ असते, की त्वचेची पाहिजे तशी काळजी घेतली जात नाही. त्याचा व्हायचा तोच परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो आणि मग चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स वाढत जातात. हा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय नक्कीच करता येतात. त्यासाठी बटाटा हा एक उत्तम पदार्थ आहे. कारण बटाटा हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो (how to get rid of pigmentation and dark circles?). त्याचा वापर करून त्वचेचं सौंदर्य कसं खुलवायचं ते आता पाहुया..(use of potato to reduce pigmentation on skin and dark circles)
त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी बटाट्याचा वापर कसा करायचा
१. चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट घालविण्यासाठी...
चेहऱ्यावर जर खूप डार्क स्पॉट असतील तर ते घालविण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करून पाहा. यासाठी एका वाटीमध्ये २ चमचे तांदळाचं पीठ घ्या. त्या पिठामध्ये चिमूटभर हळद घाला.
फक्त ६ सवयी बदलल्या तरी व्हाल सुपरफिट, ठणठणीत तब्येतीसाठी सोपा फॉर्म्युला! अवघड काहीच नाही..
यानंतर त्यात बटाट्याचा रस घालून ते पीठ कालवून घ्या. आता हा मास्क तुमच्या चेहऱ्याला लावा. यानंतर १० ते १२ मिनिटांनी हलक्या हाताने चोळून चेहरा धुवून टाका. डार्क स्पॉट, पिगमेंटेशन एकदम कमी होतील.
२. डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे कमी करण्यासाठी...
डोळ्यांभोवती काळी वर्तुळे खूप वाढली असतील तर ती कमी करण्यासाठी बटाट्याचा रस वापरता येतो. यासाठी एक टीस्पून कॉफी पावडर घ्या.
नवरात्री विशेष : उपवासाचा खमंग- कुरकुरीत-जाळीदार डोसा, फक्त १० मिनिटांची रेसिपी, चवीला मस्त
त्यामध्ये बटाट्याचा रस घाला. आता हा लेप रात्री झोपण्यापुर्वी तुमच्या डोळ्यांभोवती लावा. त्यानंतर १० मिनिटांनी चेहरा धुवून घ्या आणि डोळ्यांभोवती बदामाचं तेल लावा. काही दिवसांतच डार्क सर्कल्स कमी होतील.