lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > डोक्यावर पांढरे केस जास्त झाले, डाय नको? नारळाच्या तेलाबरोबर हा पदार्थ लावा, काळेभोर होतील केस

डोक्यावर पांढरे केस जास्त झाले, डाय नको? नारळाच्या तेलाबरोबर हा पदार्थ लावा, काळेभोर होतील केस

How to get Rid of Grey Hairs Naturally :

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 10:16 PM2024-02-13T22:16:47+5:302024-02-13T22:28:37+5:30

How to get Rid of Grey Hairs Naturally :

How to get Rid of Grey Hairs Naturally : How to Get Rid Of Grey Hairs Naturally At Home | डोक्यावर पांढरे केस जास्त झाले, डाय नको? नारळाच्या तेलाबरोबर हा पदार्थ लावा, काळेभोर होतील केस

डोक्यावर पांढरे केस जास्त झाले, डाय नको? नारळाच्या तेलाबरोबर हा पदार्थ लावा, काळेभोर होतील केस

वाढत्या वयात डोक्यावरचे केस पांढरे  होणं हे खूपच कॉमन आहे. एकदा पांढरे झालेले केस पुन्हा काळे करण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. डाय लावल्यानंतर लगेच केस  काळे होत असले तरी ते पुन्हा पांढरे व्हायला वेळ लागत नाही.  केस पांढरे होणं केसांच्या समस्यांचे लक्षण आहे. (How to Get Rid Of Grey Hairs Naturally At Home)

हॉर्मोनल बदल, पोषक घटकांची कमतरता यामुळे कमी वेळात केस पांढरे होऊ लागतात. काही नैसर्गिक घटकांचा केसांवर उपयोग केल्यास केस गळतीची समस्या उद्भवत नाही. नारळाचे तेल काही घरगुती उपायांपैकी एक आहे. ज्यामुळे केसांचा काळेपणा टिकून  राहतो आणि केस शाईन करतात. (Home Remedies For Grey Hairs)

पांढऱ्या केसांसाठी नारळाच्या तेलाचा वापर कसा करावा?

नारळाचे तेल आयुर्वेदीक तेलांमध्ये गणले जाते.  या तेलांच्या वापराने केसांच्या मुळांपासून, स्काल्पपासून फायदेच फायदे मिळतात. यात एंटी ऑक्सिडेंट्सचे प्रमाण भरपूर असते. नारळाचे तेल उन्हाच्या हानिकारक किरणांपासून रक्षण करते. यामुळे केसांचे होणारे नुकसान टाळता येते आणि फ्रि रॅडिकल्सपासूनही बचाव होतो. 

नारळाचे तेल आणि लिंबू

लिंबाच्या रसाबरोबर नारळाचे तेल मिसळून लावल्याने पांढऱ्या केसांची समस्या दूर होते. यामुळे केस काळे होण्यास मदत होते.  केसांवरील घाण कमी होते. जवळपास ३ चमचे नारळाच्या तेलात लिंबू मिसळून हे लिक्विड तयार करा आणि केसांच्या मुळांना लावा. जवळपास ५० ते ६० मिनिटं लावून ठेवल्यानंतर डोकं धुवून  स्वच्छ करा. आठवड्यातून कमीत कमी एकदा हा  उपाय करा केसांवर तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल.

मेहेंदी आणि नारळाचे तेल

मेहेंदी  केस काळे होण्याबरोबरच केसांना दाट आणि मुलायम बनवण्यासाठी फायदेशीर ठरते. मेहेंदीमुळे फक्त केस   काळे होत नाही तर केसांवर चमकदारपणाही येतो. यासाठी  २ चमचे मेहेंदीत ३ चमचे नारळाचे तेल आणि २ चमचे लिंबू मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळांना व्यवस्थित लावा.  यामुळे केस काळे होतील आणि ही पेस्ट एका नॅच्युरल डाय प्रमाणे तुम्ही वापरू शकता. 

नारळाचे तेल आणि आवळा

आवळ्यात व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे केसाचे आरोग्य चांगले राहते. नारळाच्या तेलाबरोबर आवळा मिसळून लावल्याने केसांना गडद काळा रंग येतो. ३ चमचे नारळाच्या  तेलात २ चमचे आवळ्याची पावडर घालून केसांना लावा. त्यानतंर १ तासाने केस  स्वच्छ पाण्याने धुवा. एकदा  ही पेस्ट केसांना लावल्यानंतर  केस सुंदर, दाट दिसतील.

Web Title: How to get Rid of Grey Hairs Naturally : How to Get Rid Of Grey Hairs Naturally At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.