Join us
Daily Top 2Weekly Top 5

कमी वयातच त्वचा सुरकुतली? २ सोपे उपाय- चेहरा दिसेल १० वर्षे तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2025 19:46 IST

How to Get Rid of Fine Lines and Wrinkle: कमी वयातच चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या दिसायला लागल्या असतील तर हे काही उपाय करून पाहा...(home hacks for young and glowing skin)

ठळक मुद्देत्वचेची लवचिकता वाढण्यास मदत होते. त्यामुळे मग आपोआपच बारीक सुरकुत्या कमी होतात.

रोजच्या धावपळीत आपलं त्वचेकडे अजिबातच लक्ष देणं होत नाही. शिवाय आपल्या त्वचेला रोजच धूळ, धूर, ऊन, प्रदुषण या सगळ्या गोष्टींचाही सामना करावाच लागतो. या सगळ्यांचा परिणाम त्वचेवर होतो. आपला आहारही खूप बदलला आहे. त्वचेसाठी पोषक ठरतील असे पदार्थ रोजच्या रोज आपल्या जेवणात असतीलच असं नाही. बऱ्याचदा तर घाई गडबडीत आपण काय खातो, ते ही आपल्या लक्षात येत नाही. बऱ्याचदा पुरेसं पाणी प्यायल्या जात नाही. या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्वचेवर होतो. त्यामुळे मग त्वचेची लवचिकता कमी होते आणि कमी वयातच त्वचा सुरकुतलेली दिसू लागते (home hacks for young and glowing skin). असं जर तुमच्या त्वचेच्या बाबतीत होत असेल तर अगदी लगेचच हे काही उपाय करून पाहा (How to Get Rid of Fine Lines and Wrinkle?). त्वचेची लवचिकता वाढून सुरकुत्या गायब होतील.(how to maintain elasticity of skin?)

कमी वयातच त्वचा सुरकुतलेली दिसत असेल तर काय करावं?

 

१. तूप

त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी घरी तयार केलेलं साजुक तूप खूप उपयुक्त ठरतं. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात थोडंसं तरी तूप असायलाच हवं. तूप जसं आपल्या त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं, तसेच त्याचे आरोग्याला इतरही अनेक फायदे आहेत.

दसऱ्याच्या मुहूर्तावर कमी पैशात खरेदी करा सोन्याचांदीच्या कमी वजनाच्या वस्तू, मुहुर्ताची खरेदी होईल स्वस्तात

दररोज सकाळी रिकाम्यापोटी १ ग्लास गरम पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये १ चमचा तूप मिसळून प्या. असं दररोज केल्याने त्वचा छान हायड्रेटेड आणि मॉईश्चराईज होते. त्वचेची लवचिकता वाढण्यास मदत होते. त्यामुळे मग आपोआपच बारीक सुरकुत्या कमी होतात.

 

२. जवस

जवसाचं पाणी देखील त्वचेवरच्या बारीकशा सुरकुत्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं. हा उपाय करण्यासाठी जवस घेऊन ते कढईमध्ये हलकेसे भाजून घ्या. यानंतर ते मिक्सरमधून वाटून त्यांची पावडर करा.

पिंपल्समुळे वैतागलात? 'हिरवा' ज्यूस प्या! पिंपल्स, पिगमेंटेशन जाऊन चेहरा आरशासारखा चमकेल

आता या पावडरमध्ये थोडं पाणी मिसळा आणि ते गॅसवर गरम करायला ठेवा. पाण्याला जशी जशी उकळी येईल तसे तसे ते घट्ट होत जाईल. यानंतर गॅस बंद करा. पाणी गाळून घ्या. या पाण्यात काही थेंब बदामाचे तेल घाला आणि त्याने चेहऱ्याला मालिश करा. १० ते १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचा तरुण दिसेल. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Reduce wrinkles early: Two simple remedies for youthful skin.

Web Summary : Combat early wrinkles with ghee and flax seeds! Ghee hydrates skin when consumed with warm water. Flaxseed paste, massaged with almond oil, diminishes fine lines. These simple remedies promote youthful, elastic skin, reversing premature aging effects.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी