Join us  

हात गोरे पण अंडरआर्म्सवर काळा थर दिसतो? ५ उपाय-काखेचा काळेपणा दूर-चमकतील हात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 4:59 PM

How To Get Rid Of Dark Underarms : लिंबाचा रस पाण्यात मिसळून अंडरआर्म्सवर लावा. यामुळे तुमच्या त्वचेचा रंगही सुधारेल.

ऊन्हाळ्याच्या दिवसांत घाम येणं खूपच कॉमन आहे. (Summer Skin Care Tips) अनेकदा  अंडरआर्म्समधून घामाच्या भरपूर धारा वाहतात आणि काखेत काळेपणा येतो.  अंडरआर्म्स काळे पडतात आणि स्लिव्हजलेस ड्रेसमध्ये ते खूपच विचित्र दिसून  येते. काळे अंडरआर्म्स अजिबात चांगले दिसत नाही. (How to Remove  Under Arms Tanning)

काही घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही अंडरआर्म्स काळेपणा दूर करू शकता. घरगुती उपचारांमध्ये वापरण्यात येणारे सर्व घटक तुम्हाला घरच्या घरी मिळतील आणि त्यासाठी तुम्हाला कोणताही खर्च लागणार  नाही. त्यामुळे आज  तुम्हाला अशा 10 गोष्टी सांगणार आहोत ज्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. (Tanning Removal  Tips)

१) बेकींग सोडा

१ मोठा चमचा बेकींग सोडा घ्या आणि त्यात  १ छोटा चमचा पाणी घाला. त्याच मिश्रणाने अंडरआर्म्स स्किनवर स्क्रब करा त्यानंतर ५ मिनिटं स्वच्छ करून घ्या. बेकींग सोडा एक्सफोलिएटींग पावर असते. ज्यामुळे डेड स्किन रिमुव्ह होण्यास मदत होते. 

२) एलोवेरा जेल

एलोवेराल जेलमध्ये व्हिटामीन सी असते. त्वचेचा रंग निखारण्यास मदत होते. अनेक वेळा शरीरात पाणी कमी झाल्यामुळे त्वचा काळी पडते.   एलोवेरा डिहायड्रेट त्वचेला हायड्रेट करते आणि काळेपणा कमी करते. तुम्ही ते त्वचेवर सोडू शकता कारण ते त्वचेत शोषले जाते.

३) गुलाबपाणी

कोरडेपणामुळेही त्वचा काळी पडते. गुलाब पाण्यात नैसर्गिक मॉइश्चरायझर असते. अंडरआर्म्सवर लावल्यास काळेपणा निघून जाईल आणि अंडरआर्म्समधून दुर्गंधी येणार नाही.

४) लिंबाचा रस

लिंबाचा रस पाण्यात मिसळून अंडरआर्म्सवर लावा. यामुळे तुमच्या त्वचेचा रंगही सुधारेल. लिंबाची साल देखील अंडरआर्म्सवर हलक्या हाताने चोळू शकता. याचा तुम्हाला खूप फायदा होईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी