Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरियन मुलाने सांगितला तळपायांच्या भेगा रातोरात गायब करण्याचा भन्नाट उपाय- बघा तुफान व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2026 16:11 IST

How to Get Rid of Cracked Heels?: तळपायांना पडलेल्या भेगा जर अवघ्या काही तासांत घालवायच्या असतील तर काय उपाय करायला पाहिजे याचा एक कोरियन व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे...(viral hacks to get clean feet)

ठळक मुद्देभेगाळलेले तळपाय एका रात्रीत अगदी मऊ, कोमल कसे करावे, याचा उपाय

काही लोक असे असतात की त्यांच्या पायाला वर्षभर खूप भेगा असतात. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडल्याने तळपायाला भेगा पडतात तर उन्हाळ्यात उष्णता वाढल्याने तळपाय भेगाळतात. या दोन्ही प्रकारात तळपायाला त्रास तर खूप होतोच, पण त्यासोबतच पायही खूप घाण दिसतात. चारचौघांसमोर तळपाय दिसण्याची भीती वाटते. हे सगळं टाळून जर तुम्हाला तळपाय अगदी स्वच्छ, मऊ करायचे असतील तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा (viral hacks to get clean feet). सध्या हा उपाय सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून एका कोरियन मुलाने तो सुचवला आहे.(How to Get Rid of Cracked Heels?)

तळपायांना पडलेल्या भेगा कमी करण्याचा कोरियन उपाय

 

भेगाळलेले तळपाय एका रात्रीत अगदी मऊ, कोमल कसे करावे, याचा उपाय kochacha_ या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

मलायका अरोरा सांगते 'या' पद्धतीने खा कोरफडीचा ताजा गर, चेहऱ्यावरचं तेज कमी होणारच नाही

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी तर एका भांड्यामध्ये १ चमचा व्हॅसलिन, १ चमचा शाम्पू, १ चमचा बेकिंग सोडा आणि १ चमचा लिंबाचा रस घ्या. आता सगळे पदार्थ व्यवस्थित कालवून एकत्र करून घ्या. 

यानंतर तुमचे पाय स्वच्छ धुवून पुसून घ्या. तयार केलेला लेप तळपायांना लावून १- २ मिनिटे मालिश करा. यानंतर तळपाय प्लास्टिकच्या पिशवीने लपेटून घ्या.

 

बाजारात किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर सिलिकॉन सॉक्सही मिळतात. ते ही तुम्ही घालू शकता. यानंतर साधे सॉक्स घाला आणि रात्रभर पाय तसेच राहू द्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी पाय स्वच्छ धुवा. घासून घ्या. पायांवरची डेडस्किन कमी होऊन पायाच्या भेगा खूप कमी झालेल्या असतील.

सुटीत मुलांचं करायचं काय? आईबाबांसाठी ५ टिप्स- मोबाईलशिवायही मुलं मस्त एन्जॉय करतील सुट्टी...

हा उपाय खूप व्हायरल होत आहे हे तर ठिक आहे. पण हे सगळे पदार्थ १० ते १२ तास आपल्या त्वचेवर ठेवणं योग्य नाही. त्यामुळे हा उपाय करा. पण साधारण अर्धा ते पाऊण तासात पाय धुवून टाका. हवं तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करा. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Korean hack vanishes cracked heels overnight: Viral video solution.

Web Summary : A Korean skincare hack is trending for healing cracked heels. Mix vaseline, shampoo, baking soda, and lemon juice. Apply, wrap feet, and wear socks overnight. For sensitive skin, limit application to 30-45 minutes.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीसोशल व्हायरल