Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > उष्णतेमुळे भेगाळलेल्या तळपायांना 'या' पद्धतीने लावा कोरफड, भेगा भरतील- तळपाय होतील मऊ

उष्णतेमुळे भेगाळलेल्या तळपायांना 'या' पद्धतीने लावा कोरफड, भेगा भरतील- तळपाय होतील मऊ

How to Get Rid of Cracked Heel?: उष्णतेमुळे तळपायांना खूप भेगा पडल्या असतील तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा...(simple home remedies for soft feet)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2026 15:40 IST2026-04-08T15:39:31+5:302026-04-08T15:40:11+5:30

How to Get Rid of Cracked Heel?: उष्णतेमुळे तळपायांना खूप भेगा पडल्या असतील तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा...(simple home remedies for soft feet)

how to get rid of cracked heel, simple home remedies for soft feet, home hacks for cracked heel | उष्णतेमुळे भेगाळलेल्या तळपायांना 'या' पद्धतीने लावा कोरफड, भेगा भरतील- तळपाय होतील मऊ

उष्णतेमुळे भेगाळलेल्या तळपायांना 'या' पद्धतीने लावा कोरफड, भेगा भरतील- तळपाय होतील मऊ

Highlightsकोरफड त्वचा आणि केसांसाठी चांगली असते हे तर आपल्याला माहितीच आहे. आता तिचा उपयोग करून तळपायांवरच्या भेगा कशा कमी करायच्या ते पाहा.

हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतुंमध्ये तळपायांना खूप जपावं लागतं. कारण हिवाळ्यात थंड कोरड्या वातावरणामुळे तळपायांना भेगा पडतात. कधी कधी त्या भेगा एवढ्या वाढतात की पाय रक्ताळतात. तेच पुन्हा उन्हाळ्याच्या दिवसांत. उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढली पायांना भेगा पडायला सुरुवात होते. त्यामुळे पाय खूप खराब होतात. कधी कधी भेगा वाढत जाऊन त्यातून रक्तही येतं. त्यांना खूप खाज येते. हे सगळे त्रास कमी करायचे असतील तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करा (How to Get Rid of Cracked Heel?).. हा उपाय केल्याने तळपायांच्या भेगा भरून येण्यास नक्कीच मदत होईल.(simple home remedies for soft feet)

 

तळपायांच्या भेगा भरून काढण्यासाठी कोरफडीचा उपाय

कोरफड त्वचा आणि केसांसाठी चांगली असते हे तर आपल्याला माहितीच आहे. आता तिचा उपयोग करून तळपायांवरच्या भेगा कशा कमी करायच्या ते पाहा. यासाठी आपल्याला ताजी कोरफड लागणार आहे. ती मधोमध उभी कापा.

चेहऱ्याला लावा चमचाभर साबुदाणा, त्वचा होईल टाईट आणि सुरकुत्या गायब

आता तिच्यामधल्या गरावर कॉफी पावडर, थोडीशी पिठीसाखर आणि चिमूटभर हळद घाला. नंतर ती तळपायांवरच्या भेगांवर चोळून ५ ते १० मिनिटे पायांना मालिश करा. त्यानंतर पुढचे १० ते १५ मिनिटे पाय तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवून टाका. पाय धुतल्यानंतर त्यांना माॅईश्चराईज करा आणि पायात सॉक्स घालून ठेवा. हा उपाय काही दिवस तरी दर एक दिवसाआड करा. बघा ८ ते १० दिवसांतच तळपायांमध्ये खूप चांगला बदल दिसून येईल. 

 

हे उपायही करून पाहा...

रोज रात्री झोपण्यापुर्वी तळपाय स्वच्छ धुवून घ्या आणि खोबरेल तेल लावून त्यांना चांगली मालिश करा. यानंतर पायात सॉक्स घालून ठेवा.

एरंडेल तेल आणि खोबरेल तेल एकत्र करून तळपायांना मालिश केल्यानेही खूप चांगला फरक दिसतो.

फक्त ४ सोपे उपाय- कडक उन्हाळ्यातही मनी प्लांट राहील हिरवागार, भराभर वाढेल मोठी वेल

मेणबत्तीचा छोटासा तुकडा घेऊन तो वितळवून घ्या. पातळ झालेल्या मेणामध्ये थोडं खोबरेल तेल आणि थोडं व्हॅसलिन घाला. आता या मिश्रणाने तळपायांना दररोज रात्री मालिश करा. भेगा जाऊन पाय छान मऊ होतील. 

 

Web Title : एलोवेरा से फटी एड़ियों का इलाज: मुलायम पैरों के लिए सरल घरेलू उपाय।

Web Summary : एलोवेरा, कॉफी, चीनी और हल्दी से गर्मी के कारण फटी एड़ियों से लड़ें। लगाएं, मालिश करें और मॉइस्चराइज़ करें। नारियल या अरंडी के तेल की मालिश भी मदद करती है। मोम, नारियल तेल और वैसलीन का मिश्रण पैरों को मुलायम बनाता है।

Web Title : Heal cracked heels with aloe vera: Simple home remedies for soft feet.

Web Summary : Combat cracked heels caused by heat with aloe vera, coffee, sugar, and turmeric. Apply, massage, and moisturize. Coconut or castor oil massages also help. A wax, coconut oil, and Vaseline mix softens feet.