नाकाजवळील भागात ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स दिसण्याची समस्या अनेकजणींना सतावते. कायम नाकाजवळील भागात दिसणारे हे ब्लॅकहेड्स चेहऱ्याचे सौंदर्य (How to remove blackheads and whiteheads permanently with home remedies) कमी करतात. विशेषतः वयात आलेल्या मुलींमध्ये किंवा तेलकट त्वचा (How to remove blackheads in 5 minutes) असलेल्या लोकांमध्ये ही समस्या अधिक जास्त जाणवते. ब्लॅकहेड्स हे त्वचेतील रोमछिद्रांमध्ये साचलेला मळ, तेल, आणि मृत त्वचा यांच्या मिश्रणामुळे तयार होतात, जे हवेच्या संपर्कात आल्यावर त्यांचा रंग बदलून काळसर होतो(How To Get Rid of Blackheads, Whiteheads, and Open Pores Naturally).
नाकावरील हे ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी बाजारात अनेक फेसवॉश, स्क्रब्स आणि स्ट्रिप्स उपलब्ध असले तरी त्यांचा प्रभाव नेहमी टिकतोच असे नाही. याउलट, घरगुती उपाय हे नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन केले असल्यामुळे त्वचेला हानी न पोहोचवता काळजीपूर्वक त्वचेची खोलवर सफाई करतात. ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी केमिकल्सयुक्त (How To Get Rid of Blackheads & Whiteheads) ब्यूटी प्रॉडक्टसवर भरपूर पैसे खर्च करण्यापेक्षा काही घरगुती उपाय करून नैसर्गिक पद्धतीने ब्लॅकहेड्स कमी करता येतात. घरच्याघरीच उपलब्ध असणाऱ्या स्वयंपाक घरातील काही नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने अगदी चुटकीसरशी ब्लॅकहेड्स कसे कमी करायचे ते पाहूयात.
साहित्य :-
१. पिकलेला टोमॅटो - १ टोमॅटो२. तांदुळाचे पीठ - १ टेबलस्पून ३. हळद - १/२ टेबलस्पून ४. एलोवेरा जेल - १ टेबलस्पून
भारती सिंग केस काळे करण्यासाठी वापरते 'असे' घरगुती हेअर डाय, पांढरे केस दिसतच नाहीत...
नेमकं करायचं काय ?
नाकावरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी एक पिकलेला टोमॅटो बरोबर अर्धा कापून घ्यावा. या अर्ध्या कापलेल्या भागावर तांदुळाचे पीठ व थोडीशी हळद टाकावी. आता थेट या टोमॅटोने नाकावरील ब्लॅकहेड्सच्या भागात स्क्रब करून घ्यावे. ५ ते १० मिनिटे हलके स्क्रब केल्यास त्या भागातील ब्लॅकहेड्स आणि त्वचेतून निघणारे अतिरिक्त तेल व डेड स्किन काढून टाकण्यास मदत होते. त्यानंतर, फ्रेश एलोवेरा जेल घेऊन ते नाकाभोवतालच्या भागात लावून १० मिनिटे तसेच त्वचेवर ठेवून द्यावे. १० मिनिटानंतर स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर आपण बघू शकता की नाकावरील ब्लॅकहेड्सचे प्रमाण कमी झालेले असेल. अशा प्रकारे आपण घरगुती उपायाचा वापर करुन झटपट ब्लॅकहेड्स काढू शकतो.