Join us

Bindi- Tikli Allergy: टिकली लावल्याने कपाळावर पुरळ उठते, खाज येते? ५ उपाय.. टिकली लावा बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 18:33 IST

Bindi/ Tikli allergy: टिकली लावल्यानंतर अनेक जणांना त्याठिकाणी खाज येते. पुरळ उठतात, तो भाग लाल होऊन जातो. असा सगळा त्रास होऊ नये, यासाठी ५ सोपे उपाय..(home remedies)

ठळक मुद्देटिकली लावली की त्या जागेवर पुरळ येतात किंवा मग खूप खाज येते. हा त्रास कमी करण्यासाठी काही सोपे उपाय करून बघा..

एरवी डेली रुटीनमध्ये आजकाल बऱ्याच जणी टिकली (tikli/ bindi) लावत नाहीत. पण तरीही जेव्हा एखाद्यावेळी आपण काही खास ड्रेसिंग करतो किंवा मग लग्नकार्य, एखादा समारंभ असतो तेव्हा हमखास टिकलीची आठवण येते. काही प्रसंग किंवा आपला एखादा ड्रेस, साडी अशी असते की त्यावर जाेपर्यंत आपण टिकली लावत नाही, तोपर्यंत आपले सौंदर्य खुलत नाही. पण काही जणींना नेमकी टिकलीची ॲलर्जी (How to get rid of bindi allergies) असते. टिकली लावली की त्या जागेवर पुरळ येतात किंवा मग खूप खाज येते. हा त्रास कमी करण्यासाठी काही सोपे उपाय करून बघा..

 

टिकलीची ॲलर्जी होत असल्यास...१. खोबरेल तेल किंवा तिळाचं तेलटिकलीमध्ये असणारं ब्यूटीन फिनॉल हे केमिकल सेंसिटीव्ह त्वचेसाठी त्रासदायक ठरतं. हा त्रास कमी करण्यासाठी खोबरेल तेल आणि तिळाचं तेल उपयुक्त ठरतं. टिकली लावण्याच्या साधारण अर्धा तास आधी बोटावर थेंबभर खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल घ्या आणि टिकली लावता तेथे मसाज करा. अर्ध्यातासाने  त्या भागावर टिकली लावा. त्रास होणार नाही. 

 

२. कोरफड जेलकोरफड जेल देखील टिकलीचं इन्फेक्शन दूर करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. कोरफडीमध्ये व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात असल्याने त्वचेसाठी ते पोषक ठरतं. कोरफड जेल बोटावर घेऊन त्याने टिकली लावता त्या जागी मसाज करा आणि १० ते १५ मिनिटांनी टिकली लावा. टिकली काढल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी कोरफड जेल लावून टाका. 

 

३. हळद आणि कडुनिंबहळद आणि कडुनिंब या दोघांमध्येही ॲण्टी बॅक्टेरियल आणि ॲण्टी फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेसंदर्भात होणारं कोणतंही इन्फेक्शन या दोन्हीच्या वापराने कमी होऊ शकतं. टिकली लावल्यामुळे त्या भागावर खाज येत असेल, पुरळ आलं असेल तर कडुनिंबाची पानं चुरून घ्या. एका पातेल्यात टाका. त्यात चिमुटभर हळद टाका. हे मिश्रण व्यवस्थित उकळून घ्या. त्यानंतर बोटावर घेऊन ते इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावा. 

 

४. मॉईश्चरायजर आणि पावडरतुमचं रोजच्या वापरातलं माॅईश्चरायजर आणि टाल्कम पावडर या दोन्ही गोष्टी टिकलीचं इन्फेक्शन होण्यापासून त्वचेचं संरक्षण करतात. यासाठी सगळ्यात आधी तुमचं नेहमीचं माॅईश्चरायजर बोटावर घ्या आणि कपाळावर मसाज करा. त्यानंतर त्या भागावर टाल्कम पावडर लावा आणि त्यावर टिकली लावा. त्रास होणार नाही. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी