Join us
Daily Top 2Weekly Top 5

फक्त १० रुपये खर्च आणि चेहऱ्यावरचे काळे डाग-पिगमेंटेशन गायब, साइड इफेक्ट नसणारा १ सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2025 16:45 IST

Skin Care Tips: पिगमेंटेशन, ॲक्ने यामुळे वैतागून गेला असाला तर हा एक सोपा उपाय घरच्याघरी करून पाहा..(how to get rid of acne and pigmentation?)

ठळक मुद्दे काही दिवस हा उपाय नियमितपणे केल्यास पिगमेंटेशन, ॲक्ने कमी होण्यास नक्कीच मदत होईल. 

रोजच्या धावपळीत आपण एवढे जास्त थकून जातो की रोजच्यारोज त्वचेची पुरेशी काळजी घेणं होत नाही. त्वचेची काळजी घ्यायची म्हणजे फक्त चेहरा धुवायचा आणि मॉईश्चरायजर लावायचं एवढंच नाही. कारण आपल्या त्वचेला नेहमीच ऊन, धूळ, प्रदुषण यांचा सामना करावा लागतो. त्यांचा त्वचेवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे मग डेडस्किन, पिंगमेंटेशन, ॲक्ने, टॅनिंग, पिंपल्स असा त्रास वाढत जातो. यामुळे मग चेहरा खूपच खराब दिसायला लागतो. म्हणूनच त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि पिगमेंटेशन, ॲक्ने असा त्रास कमी करण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(how to get rid of acne and pigmentation?)

 

त्वचेवरचे पिगमेंटेशन, ॲक्ने कमी करण्यासाठी उपाय

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सगळे घरातलेच पदार्थ घ्यायचे आहेत. त्यासाठी सगळ्यात आधी तर एका वाटीमध्ये १ चमचा ज्येष्ठमधाची पावडर घ्या. ज्येष्ठमधामध्ये असणारे गुणधर्म त्वचेवरचे पिगमेंटेशन, वांगाचे डाग, पिंपल्समुळे चेहऱ्यावर येणारे काळे डाग कमी करण्यासाठी मदत करतात.

केस धुतांना नेहमीच्या शाम्पूत ‘हा’ पदार्थ घाला, केसांचं गळणं गायब-केसांवर येईल चमक-होतील सुळसुळीत

आता त्यामध्ये १ चमचा तांदळाचं पीठ घाला. हल्ली कोरियन ग्लास स्किनच्या ट्रेण्डमुळे तांदूळ त्वचेसाठी किती उपयुक्त ठरतात ते आपल्याला माहितीच आहे.

 

आता या दोन पिठांमध्ये १ चमचा टोमॅटोची प्युरी आणि १ चमचा बटाट्याचा रस घाला. बटाट्याचा रस आणि टोमॅटो या दोघांनाही नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखलं जातं.

मुगाच्या डाळीचा पिझ्झा, सुपरटेस्टी आणि प्रोटीनही भरपूर! चव अशी भारी की मैद्याचा पिझ्झा कायमचा विसर

त्वचेचा रंग एकसमान करण्यासाठी हे दोन्ही पदार्थ खूप उपयुक्त ठरतात. आता सगळे पदार्थ एकत्र कालवून घ्या आणि त्याचा लेप चेहऱ्याला लावा. साधारण १० मिनिटांनी हलक्या हाताने मालिश करून चेहरा धुवून टाका. चेहरा धुतल्यानंतर माॅईश्चरायजर लावा. काही दिवस हा उपाय नियमितपणे केल्यास पिगमेंटेशन, ॲक्ने कमी होण्यास नक्कीच मदत होईल. 

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Simple ₹10 remedy: Clear skin by removing dark spots, acne.

Web Summary : Fight acne and pigmentation with a simple homemade remedy. Mix licorice powder, rice flour, tomato puree, and potato juice. Apply the paste, massage after 10 minutes and wash. Regular use helps achieve clear, even-toned skin.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीटोमॅटोबटाटा