आपल्यापैकी प्रत्येकीलाच आपली त्वचा निरोगी, सुंदर आणि आकर्षक असावी असे वाटते. पण चेहऱ्यावर जेव्हा अचानक काही समस्या दिसू लागतात, तेव्हा आपला आत्मविश्वास कमी होतो. हिवाळा असो किंवा उन्हाळा चेहऱ्यावर अचानक दिसू लागणारे पांढरे छोटे दाणे, विशेषतः हनुवटीवर, अनेकांना त्रासदायक वाटतात. हनुवटीच्या भागावर छोटे, पांढऱ्या रंगाचे दाणे दिसू लागल्यास सौंदर्य बिघडते आणि आपल्याला नेमके काय करावे हे समजत नाही. हे पांढरे दाणे दिसायला लहान असले तरी त्वचा खडबडीत, निस्तेज आणि अस्वच्छ दिसण्यास कारणीभूत ठरतात(how to remove chin acne).
हनुवटीच्या भागात दिसणारे पांढरे दाणे अनेकदा 'व्हाईटहेड्स' (Whiteheads) किंवा 'मिलिया' (Milia) असू शकतात. हे सामान्यतः हानिकारक नसले तरी, त्यांचा वेळेवर उपचार न केल्यास ते अधिक त्रासदायक ठरू शकतात. हनुवटीवर हे पांढरे छोटे दाणे दिसण्याची नेमकी कारणे कोणती आहेत, तसेच या समस्येवर घरगुती उपाय आणि उपचार काय आहेत, ज्यामुळे त्वचा (dermatologist tips for chin pimples) पुन्हा नितळ आणि निरोगी होईल यासाठी नेमकं काय करता येईल ते पाहूयात.
एक्सपर्ट नेमकं काय म्हणतात?
या संदर्भात, प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ (Dermatologist) अंकुर सरीन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्किनचे डॉक्टर सांगतात की, हनुवटीवर दिसणारे हे छोटे-पांढरे दाणे खरेतर सेबेशियस ग्रंथी (Sebaceous Glands) म्हणजेच तेल बनवणाऱ्या ग्रंथी असतात.
जेव्हा त्वचेवर तेल जास्त प्रमाणात तयार होते किंवा त्वचा स्वच्छ नसते, तेव्हा हे दाणे अधिक स्पष्टपणे दिसू लागतात. काही लोकांमध्ये हार्मोनल बदल, तेलकट त्वचा आणि चुकीची स्किनकेअर हे देखील याचे कारण असू शकते.
अनेक लोक या दाण्यांना मुरुम समजतात आणि त्यांना नखाने काढण्याचा प्रयत्न करतात, पण असे करणे त्वचेला नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे, त्यांना योग्य पद्धतीने काढून टाकणे आवश्यक आहे.
हिवाळ्यात केस खराट्यासारखे रखरखीत होऊन गळत असतील तर लावा ३ तेल, थंडीत तुमचे केस होतील रेशमी...
हनुवटीवरील या पांढऱ्या दाण्यांना साफ करण्यासाठी काय करावे?
१. आठवड्यातून १ ते २ वेळा एक्सफोलिएशन करा :- डॉक्टर अंकुर सरीन म्हणतात, एका सौम्य एक्सफोलिएंटने आठवड्यातून १ ते २ वेळा त्वचेला एक्सफोलिएट करा. एक्सफोलिएशनमुळे त्वचेच्या मृत पेशी साफ होतात आणि छिद्र देखील उघडतात. यामुळे पांढरे दाणे तयार होण्याची शक्यता कमी होते.
२. रात्री रेटिनॉल सीरम लावा :- झोपण्यापूर्वी चेहरा चांगला धुवून रेटिनॉल (Retinol) लावा. रेटिनॉल त्वचेच्या पेशींचे टर्नओव्हर वाढवते, ज्यामुळे दाणे हळूहळू आकारात कमी होऊ लागतात. सुरुवातीला रेटिनॉल सीरमचा कमी प्रमाणात वापर करावा आणि हळूहळू उपयोग वाढवा, जेणेकरून त्वचेला त्याची सवय होईल.
३. मॉइश्चरायझर :- रेटिनॉलमुळे त्वचा कोरडी होऊ शकते, म्हणून त्वचेचा समतोल राखण्यासाठी हलके मॉइश्चरायझर लावणे गरजेचे असते. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि जास्त तेल उत्पादन देखील कमी होते.
कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ?
१. या पांढऱ्या दाण्यांना दाबून किंवा नखाने काढून टाकण्याचा प्रयत्न करू नका.
२. खूप हार्श किंवा हार्ड ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर किंवा जास्त स्क्रबिंग करणे टाळा.
३. जर दाणे खूप जास्त असतील किंवा जळजळ होऊ लागली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हनुवटीवर येणारे छोटे-पांढरे दाणे फारच कॉमन असतात आणि योग्य स्किनकेअरने ते हळूहळू कमी केले जाऊ शकतात.
Web Summary : Whiteheads or milia on the chin can be addressed with proper skincare. Dermatologist Dr. Sarin advises gentle exfoliation, retinol serum at night, and moisturizer to manage oil and dead skin. Avoid picking; consult a doctor for severe cases.
Web Summary : ठोड़ी पर व्हाइटहेड्स या मिलिया को उचित त्वचा देखभाल से ठीक किया जा सकता है। त्वचा विशेषज्ञ डॉ. सरीन तेल और मृत त्वचा को प्रबंधित करने के लिए रात में हल्के एक्सफोलिएशन, रेटिनॉल सीरम और मॉइस्चराइजर लगाने की सलाह देते हैं। फोड़ने से बचें; गंभीर मामलों के लिए डॉक्टर से सलाह लें।