Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > चेहरा गुबगुबीत- सुजलेला दिसतो? ५ ट्रिक्स, काही दिवसांतच चेहरा होईल रेखीव- मिळेल परफेक्ट जॉ लाईन 

चेहरा गुबगुबीत- सुजलेला दिसतो? ५ ट्रिक्स, काही दिवसांतच चेहरा होईल रेखीव- मिळेल परफेक्ट जॉ लाईन 

How to Get Perfect Jaw Line?: चेहऱ्याला छान आकार येऊन नॅचरल ग्लो हवा असेल तर पुढे सांगितलेले काही व्यायाम नियमितपणे करून पाहा..(exercises for getting perfect jaw line)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2026 09:35 IST2026-04-04T09:32:54+5:302026-04-04T09:35:01+5:30

How to Get Perfect Jaw Line?: चेहऱ्याला छान आकार येऊन नॅचरल ग्लो हवा असेल तर पुढे सांगितलेले काही व्यायाम नियमितपणे करून पाहा..(exercises for getting perfect jaw line)

how to get perfect jaw line, exercises for getting perfect jaw line, how to reduce fluffiness of face  | चेहरा गुबगुबीत- सुजलेला दिसतो? ५ ट्रिक्स, काही दिवसांतच चेहरा होईल रेखीव- मिळेल परफेक्ट जॉ लाईन 

चेहरा गुबगुबीत- सुजलेला दिसतो? ५ ट्रिक्स, काही दिवसांतच चेहरा होईल रेखीव- मिळेल परफेक्ट जॉ लाईन 

आपल्या शरीराला जशी व्यायामाची गरज असते, तशीच गरज आपल्या चेहऱ्यालाही असते. साधारण तिशी- पस्तिशीनंतर आपण असं पाहातो की चेहराही सुजल्यासारखा दिसायला लागतो. गुबगुबीत होऊन जातो. त्यामुळे मग आपण जाड नसलो तरी लठ्ठ वाटायला लागतो. हे टाळायचं असेल तर चेहऱ्याचे काही व्यायाम नियमितपणे करून पाहा. हे व्यायाम केल्याने चेहऱ्याला छान आकार येऊन तो रेखीव होईल. जॉ- लाईन परफेक्ट दिसायला लागेल आणि दुसरं म्हणजे त्वचेवर नॅचरल ग्लो येण्यास मदत होईल (How to Get Perfect Jaw Line?). कारण यामुळे त्वचेखाली रक्ताभिसरण चांगले होऊन त्वचेवर चमक येते.(exercises for getting perfect jaw line)

 

परफेक्ट जॉ लाईन मिळविण्यासाठी व्यायाम 

१. पहिला व्यामाम करण्यासाठी जॉ- लाईन डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे हलवा. दोन्ही बाजुंनी प्रत्येकी १०- १० वेळा हा व्यायाम करावा. असं करताना वरचे दात मात्र एकाजागीच ठेवावेत. ते हलवू नयेत. 

३ गोष्टींकडे लक्ष द्या, पाळी आल्यानंतरही मुलींची उंची नक्कीच वाढते, मात्र त्यासाठी...

२. ओठ बंद ठेवावे आणि त्यानंतर बंद ओठ उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे वळवावे. हा व्यायामही दोन्ही बाजुंनी प्रत्येकी १०- १० वेळा करावा.

३. तिसरा व्यायाम करण्यासाठी तोंड उघडून मोठा 'आ' करायचा आणि नंतर पुन्हा तोंड बंद करायचे. हा व्यायाम १० ते १५ वेळा करावा.

 

४. चौथा व्यायाम करण्यासाठी श्वास घ्या. तोंडात हवा भरून ओठ बंद करा आणि गाल फुगवा. त्यानंतर पुन्हा 'आ' करा. असं साधारण १५ वेळा करा.

५. यानंतर ओठ बंद ठेवा. जीभ तोंडातल्या तोंडात फिरवून एकदा उजव्या गालाला तर एकदा डाव्या गालाला आतल्याआत लावा. हा व्यायामही दोन्ही बाजुंनी प्रत्येकी १०- १० वेळा करावा.

भारतातल्या महिलांना लवकर सुरू होतोय मेनोपॉज, बघा त्यामागची कारणं आणि तब्येतीवर होणारे परिणाम

६. दोन्ही हाताचा अंगठा आणि पहिलं बोट हनुवटीवर ठेवा. यानंतर ते ओढत कानाच्या मागेपर्यंत न्या. यामुळे जॉ लाईनला छान आकार येतो. हा व्यायामही १० वेळा करा. तुम्हाला दिवसातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे व्यायाम करू शकता. 

 

Web Title : सुडौल चेहरा पाएं: जबड़े के लिए 5 व्यायाम जो देंगे परफेक्ट जॉलाइन

Web Summary : चेहरे के व्यायाम सूजन को कम करने और जबड़े को परिभाषित करने में मदद करते हैं। नियमित अभ्यास से रक्त परिसंचरण में सुधार होता है, जिससे आपकी त्वचा को प्राकृतिक चमक मिलती है। अधिक सुडौल और युवा दिखने के लिए इन सरल व्यायामों को आजमाएं।

Web Title : Get a sculpted face: 5 exercises for a perfect jawline.

Web Summary : Facial exercises can help reduce puffiness and define your jawline. Regular practice improves blood circulation, giving your skin a natural glow. Try these simple exercises for a more sculpted and youthful appearance.