Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > फक्त १५ दिवस चेहऱ्याला 'हा' लेप लावा, त्वचेवर नवं तेज येऊन चेहरा चमकेल, रूप खुलेल

फक्त १५ दिवस चेहऱ्याला 'हा' लेप लावा, त्वचेवर नवं तेज येऊन चेहरा चमकेल, रूप खुलेल

How to Get Naturally Glowing Skin?: फक्त १५ दिवसांत त्वचेमध्ये होणारा बदल अनुभवायचा असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहाच...(home hacks for radiant glow)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2025 15:36 IST2025-11-24T15:36:02+5:302025-11-24T15:36:46+5:30

How to Get Naturally Glowing Skin?: फक्त १५ दिवसांत त्वचेमध्ये होणारा बदल अनुभवायचा असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहाच...(home hacks for radiant glow)

how to get naturally glowing skin, home hacks for radiant glow, how to use potato and tomato for skin care | फक्त १५ दिवस चेहऱ्याला 'हा' लेप लावा, त्वचेवर नवं तेज येऊन चेहरा चमकेल, रूप खुलेल

फक्त १५ दिवस चेहऱ्याला 'हा' लेप लावा, त्वचेवर नवं तेज येऊन चेहरा चमकेल, रूप खुलेल

Highlights काही दिवस अगदी रोजच हा उपाय करून पाहा. त्वचेमध्ये खूप छान बदल झालेला दिसेल. 

ऊन, धूळ, प्रदुषण यांचा आणि त्वचेचा वारंवार संपर्क येत असेल आणि अशावेळी त्वचेची योग्य ती काळजी घेण्यात आपण कमी पडत असू तर काही दिवसांतच त्वचेवर पिगमेंटेशन, ॲक्ने दिसू लागतात. पिंपल्सचा त्रासही होतो. पिंपल्स येऊन गेल्यानंतर चेहऱ्यावर काळे डाग पडतात आणि पुढचे काही दिवस ते अजिबात जात नाहीत. यामुळे चेहऱ्यावरचं तेज आणि सौंदर्य कमी होतंच. म्हणूनच पुढे सांगितलेला एक उपाय काही दिवस नियमितपणे करून पाहा (home hacks for radiant glow). हा उपाय केल्यास पिगमेंटेशन, ॲक्ने, पिंपल्स कमी होऊन चेहरा अगदी स्वच्छ, नितळ होईल आणि त्वचेवर छान चमक येईल.(how to get naturally glowing skin?)

 

चेहऱ्यावर छान चमक, तेज येण्यासाठी काय उपाय करावा?

चेहऱ्यावरचे काळपट डाग कमी करून त्वचेवर एक छान ग्लो हवा असेल तर टोमॅटोचा रस आणि बटाट्याचा रस अतिशय उपयुक्त ठरतात. या दोन्ही पदार्थांना नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखले जाते. या दोन्ही पदार्थांमुळे त्वचेवर छान चमक येते.

हिवाळ्यातलं स्वस्तात मस्त टॉनिक म्हणजे 'ही' ५ फळं, सततची आजारपणं टळून सौंदर्यही खुलेल..

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा टोमॅटोचा रस आणि १ चमचा बटाट्याचा रस घ्या.

त्यामध्ये १ चमचा कॉफी पावडर, १ चमचा दही, १ चमचा तांदळाची पावडर घाला.

 

तांदळाची पावडर आणि कॉफी त्वचेवरचे टॅनिंग, डेडस्किन कमी करून त्वचेला नवी चमक देते तर दह्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

तळपायांना पडलेल्या भेगा काही दिवसांतच होतील गायब- 'हे' घरगुती क्रिम वापरा- टाचा होतील मऊ, कोमल

आता सगळ्यात शेवटी त्यामध्ये व्हिटॅमिन ई ची १ कॅप्सूल फोडून टाका. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या आणि त्यानंतर हा लेप चेहऱ्याला लावा.

१५ ते २० मिनिटे लेप चेहऱ्यावर तसाच ठेवा आणि त्यानंतर हलक्या हाताने चोळून धुवून टाका. काही दिवस अगदी रोजच हा उपाय करून पाहा. त्वचेमध्ये खूप छान बदल झालेला दिसेल. 

 

Web Title : दमकती त्वचा के लिए 15 दिनों तक यह फेस मास्क लगाएं।

Web Summary : घर पर बने फेस मास्क से पिगमेंटेशन और मुंहासों से लड़ें। टमाटर और आलू का रस, कॉफी, दही और चावल के आटे के साथ मिलकर त्वचा को चमकदार और हाइड्रेटेड बनाता है। नियमित उपयोग से साफ, दमकती त्वचा मिलेगी।

Web Title : Apply this face mask for 15 days for radiant, glowing skin.

Web Summary : Combat pigmentation and acne with a homemade face mask. Tomato and potato juice, combined with coffee, yogurt, and rice flour, brightens and hydrates skin. Regular use will reveal a clearer, radiant complexion.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.