केसांना लांब आणि दाट बनवण्यासाठी तुम्ही मेथीचा आपल्या हेअर केअर रूटीनमध्ये समावेश करू शकता. मेथीचा हेअर पॅक तुम्हाला आठवड्यातून १ ते २ वेळा अप्लाय करावा लागेल. त्यानंतर केसांमध्ये सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल. मेथीचा हेअर पॅक तुमच्या केसांसाठी वरदान ठरू शकतो. औषधी गुणांनी परिपूर्ण मेथीचा हेअरपॅक कसा तयार करायचा समजून घेऊ. (How To Get Long Thick Hair Using Fenugreek Seeds)
मेथीचा हेअर पॅक कसा तयार करायचा? (How To Make Methi Hair Pack)
सगळ्यात आधी पाण्यात २ स्पून मेथीचे दाणे भिजवून ठेवा. काही तासांनी भिजवलेले दाणे मिक्सरमध्ये घाला आणि पेस्ट तयार करा. एका वाटीत मेथीच्या दाण्यांची पेस्ट आणि ३ चमचे दही काढून एकजीव करून घ्या. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकजीव करा. औषधी गुणांनी परिपूर्ण ही पेस्ट केसांना लावल्यानं केसांमध्ये चांगला परिणाम दिसून येईल.
ही पेस्ट तुम्हाला हेअर पॅकप्रमाणे केसांना लावायची आहे. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही जवळपास अर्ध्या तासांसाठी पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेली ही पेस्ट लावू शकता. ३० मिनिटांनी हेअर वॉश करा. हा केमिकल फ्री हेअर पॅक आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरू शकता.
केसांसाठी फायदेशीर
हा हेअर पॅक केसांच्या मुळांना पोषण देतो. तसंच जर तुम्हाला हेअर फॉलची समस्या असेल तर हा हेअर पॅक फायदेशीर ठरू शकतो. केसांना मजबूत, लांब आणि दाट बनवण्यासाठी या हेअर पॅकचा हेअर केअर रूटीनमध्ये समावेश करा. हा हेअर पॅक तुमचे केस सिल्की बनवण्यास मदत करतो.
जर तुमचे केस पातळ असतील तर नारळाच्या तेलात २ चमचे मेथीचे दाणे घालून शिजवून घ्या. त्यानंतर हे मेथीचं तेल केसांना लावा. ज्यामुळे केस मजबूत आणि दाट होतील. जर तुमचे केस खूपच गळत असतील तर २ चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी हे दाणे वाटून पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट केसांना लावा नंतर केस धुवा. आठवड्यातून २ दिवस हा उपाय तुम्ही करू शकता.
मेथीचेच्या दाण्याचा मास्क कोरड्या केसांना पोषण देतो. हा उपाय करण्यासाठी २ चमचे दही घ्या आणि त्यात मेथीचे दाणे वाटून घाला. यात १ चमचा नारळाचं तेलही घाला. हा हेअर मास्क केसांना अर्धा तास लावून ठेवा नंतर धुवा. ज्यामुळे केस मऊसूत होतील.
Web Summary : Use fenugreek hair packs to nourish hair, combat hair fall, and promote thickness. Several methods include overnight soaking, coconut oil infusions, and yogurt masks for soft hair.
Web Summary : बालों को पोषण देने, बालों के झड़ने से निपटने और मोटाई को बढ़ावा देने के लिए मेथी हेयर पैक का उपयोग करें। कई तरीकों में रात भर भिगोना, नारियल तेल का मिश्रण और मुलायम बालों के लिए दही मास्क शामिल हैं।