लग्नसराईचा काळ सुरु झाला की नवरीला त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. वातावरणातील गारवा वाढला की त्याचा आपल्या त्वचेवर सगळ्यात जास्त परिणाम होतो.(aloe vera for glowing skin) चेहरा कोरडा पडणे, फुटणे किंवा निस्तेज दिसू लागतो. ऐन लग्नसमारंभात आपण आकर्षक, सुंदर दिसावं यासाठी त्वचेची काळजी घेणे आतापासून सुरु करायला हवी.(Korean glass skin routine) हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. दिवसभरातील धूळ, प्रदूषण, सनलाइट आणि स्क्रिनवर जमा होणारी घाण यामुळे आपल्या त्वचेवरील नैसर्गिक तेज हरवते.(aloe vera night skincare) अशावेळी आपण केमिकल्स उत्पादनांचा आपण जास्त प्रमाणात त्वचेसाठी वापर करतो. पण काही घरगुती उपाय केल्यास त्वचा कोरियन ग्लाससारखी चमकू लागेल. यासाठी काय करायला हवं, जाणून घेऊया.
साड्या अनेक, ब्लाऊज मात्र एकच! ऑफिस वेअरसाठी पाहा पुढच्या गळ्याच्या ५ स्टायलिश ब्लाऊज डिझाइन्स
भारतीय घरात सहज पण लगेच आढळणारी वनस्पती कोरफड. यात नैसर्गिक मॉइश्चर, त्वचेतील सूज कमी करणारे गुण, डेड स्किन दूर करणारी एन्झाइम्स आणि स्किनला हायड्रेट ठेवणारे पोषक तत्त्व मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोरफडीचा फ्रेश गर लावला तर तो त्वचेवर संपूर्ण रात्रभर काम करतो आणि सकाळी त्वचा दिसते अगदी ताजीतवानी.
कोरियन ग्लास क्रीम बनवण्यासाठी आपल्याला २ चमचे कोरफडीचा गर, १ चमचा तांदळाचे पाणी, १ व्हिटॅमिन ई कॅप्सूल, १ चमचा मध, १ चमचा कच्चे दूध लागेल. ही क्रीम बनवण्यासाठी आपल्याला एका भांड्यात कोरफडीचा गर, तांदळाचे पाणी मिक्स करुन त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. चमचाभर मध आणि कच्चे दूध घालून मऊ, गुळगुळीत क्रीम तयार करा.
ही क्रीम आपण रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावायला हवी. झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. नंतर ही क्रीम आपल्या बोटांनी संपूर्ण चेहऱ्याला लावून मसाज करा. सकाळी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. हा उपाय नियमितपणे केल्यास चेहऱ्यावर ग्लो येईल.
