सध्याच्या सौंदर्याच्या जगात ग्लास स्किन या शब्दाची मोठी क्रेझ आहे. आजच्या घाईगडबडीच्या जीवनात प्रत्येकालाच स्वच्छ, चमकदार आणि आरशासारखी त्वचा हवी असते.(Korean glass skin) कोरियन ग्लास स्किनचा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे़. काचेसारखी चमकणारी, डागविरहित आणि हायड्रेटेड त्वचा म्हणजे 'ग्लास स्किन' मिळवण्यासाठी अनेकजण महागड्या पार्लर ट्रीटमेंट घेतात. हजारो रुपये खर्च करतात. पण तुम्हाला माहित आहे का? या महागड्या उपचारांना पर्याय आपल्या स्वतःच्या स्वयंपाकघरात आहे. तो म्हणजे चिया सीड्स . (Chia seeds for skin)
चिया सीड्स आरोग्यासाठी सुपरफूड म्हटले जाते.पण सौंदर्याच्या बाबतीतही अळशी कोणत्या महागड्या सीरमपेक्षा कमी नाही. चिया सीड्समध्ये मुबलक प्रमाणात ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला आतून पोषण देतात.(Natural beauty tips) जेव्हा आपण चिया सीड्सचा जेल किंवा पावडर म्हणून चेहऱ्यावर वापर करतो, तेव्हा ते त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास, छिद्रे (pores) घट्ट करण्यास आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यास मदत करते. चिया सीड्सचा जेल कसा करायचा पाहूया.
दोन, तीन की रोज... आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? एक चुकीची सवय अन् पडू शकते टक्कल!
साहित्य
चिया सीड्स - २ चमचे
पाणी - १ कप
टी ट्री ऑइल - काही थेंब
कोरफडीचा गर - १ चमचा
कृती
सगळ्यात आधी एका भांड्यात चिया सीड्स घाला आणि त्यात १ कप पाणी घाला. चमच्याने ढवळत राहा. १० ते १५ मिनिटांत बिया पाणी शोषून घेतील आणि जेलसारखे घट्ट होतील. ३० ते १ तास हे मिश्रण असेच राहू द्या. चमच्याने ढवळत राहा ज्यामुळे गुठळ्या होणार नाही. आपल्याला गुळगुळीत जेल हवा असेल तर चाळणीतून गाळून घ्या. त्यात कोरफडीचा गर आणि टी ट्री ऑइल घाला. हवाबंद डब्यात भरून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. आठवडाभर हे फ्रीजमध्ये राहते.
हे जेल चेहऱ्यावर लावण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या. आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे आपली त्वचा मऊ आणि हायड्रेट राहण्यास मदत होईल. आठवड्यातून २ ते ३ वेळा हे त्वचेला लावू शकतो.
