Join us
Daily Top 2Weekly Top 5

४ बर्फाचे तुकडे आणि..! तुमच्या फ्रिजमध्येच आहे 'कोरियन ग्लास स्किन'चं ब्यूटी सिक्रेट, पार्लरच्या पैशाची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2026 12:35 IST

Korean glass skin: Ice cubes for glowing skin: Natural skincare at home: ४ प्रकारचे 'मॅजिकल' आइस क्यूब्स वापरून आपण घरच्या घरी कोरियन महिलांसारखी त्वचा मिळवू शकतो.

सध्याच्या सौंदर्याच्या जगात ग्लास स्किन या शब्दाची मोठी क्रेझ आहे. आजच्या घाईगडबडीच्या जीवनात प्रत्येकालाच स्वच्छ, चमकदार आणि आरशासारखी त्वचा हवी असते.(Korean glass skin) कोरियन ग्लास स्किनचा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे. पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करून फेशियल, क्लिनअप आणि ट्रीटमेंट घेतली जाते. पण काही केल्या त्वचेवर पिंपल्स, डाग पाहायला मिळतात. (Ice cubes for glowing skin)आपल्यालाही कोरियन मुलींसारखा तजेलदार आणि पारदर्शक चेहरा हवा असतो.(Natural skincare at home) जो नैसर्गिकरित्या चमकतो. अशी त्वचा मिळवण्यासाठी अनेक महिला पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करतात. अनेकदा महागड्या ट्रिटमेंट्स आणि केमिकलयु्क्त क्रिम्स चेहऱ्यावर लावूनही हवा तसा आपल्या ग्लो मिळत नाही. पण सौंदर्यचे सिक्रेट आपल्या किचनमध्ये, अगदी फ्रिजमध्ये लपलेले आहे. फक्त ४ प्रकारचे 'मॅजिकल' आइस क्यूब्स वापरून आपण घरच्या घरी कोरियन महिलांसारखी त्वचा मिळवू शकतो. 

मुलांना बालवाडीत कितव्या वर्षी घालावं? मुलांच्या नाजूक हातात पाटी-पेन्सिल देण्यापूर्वी समजून घ्या योग्य वयाचं गणित

त्वचेसाठी आइस थेरीपी ही सगळ्यात चांगली समजली जाते. चेहऱ्यावर बर्फ लावल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. तसेच बर्फामुळे चेहऱ्यावरील ओपन पोअर्स बंद होण्यास मदत होते आणि त्वचा घट्ट होते. पण साध्या बर्फाऐवजी जर आपण त्यात नैसर्गिक घटक मिसळले, तर त्याचे फायदे दुप्पट होतात.

बीटाचे आइस क्यूब बनवण्यासाठी आपल्याला  सगळ्यात आधी बीटाचा रस घ्यावा लागेल. तो बर्फाच्या ट्रेमध्ये घाला आणि साठवा. या बर्फाच्या तुकड्यांनी चेहऱ्यावर मालिश केल्याने त्वचेवर गुलाबी चमक येते. बीटामुळे पिग्मेंटेशन, त्वचेचा रंग आणि काळे डाग कमी करण्यास देखील मदत करते. ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेवर चमक येते. 

आपण तांदळाचे पाणी उकळवून त्याला बर्फाच्या ट्रेमध्ये साठवा. नंतर याने आपल्या त्वचेला मसाज करावा. यामुळे त्वचा गुळगुळीत होते. जर आपल्याला ओपन पोअर्स त्रास असेल तर या बर्फांमुळे त्वचा घट्ट होण्यास मदत होते. 

ताजे आणि शुद्ध कोरफडीचा गर घ्या. त्याला बर्फाच्या ट्रेमध्ये साठवा. या बर्फाचे तुकड्यांनी त्वचेला नियमितपणे मसाज केल्यास मुरुमे आणि जळजळ कमी होण्यास मदत करते. ते आपल्या त्वचेला बरे करतात. 

चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिग्मेंटेशन घालवण्यासाठी बटाटा आणि लिंबाचा आइस क्यूब हा रामबाण उपाय आहे. बटाट्याचा रस आणि त्यात थोडे लिंबू पिळून त्याचे आइस क्यूब बनवा. बटाटा नैसर्गिक ब्लीचिंगचे काम करते. ज्यामुळे आपली त्वचा क्लिअर होते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Ice Cubes: Unlock Korean Glass Skin Secret at Home

Web Summary : Achieve Korean glass skin at home using simple ice cubes! Beetroot brightens, rice water tightens pores, aloe vera heals, and potato-lemon fades dark spots. This natural therapy improves circulation, leaving skin glowing and clear, saving money on expensive treatments.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी