Join us
Daily Top 2Weekly Top 5

फक्त १० रुपयांचं बीट देतं तुम्हाला सोन्यासारखा ग्लो, फक्त २ स्टेप्स- त्वचा चमकतच राहील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2026 16:44 IST

Beet Root Face Mask for Glowing Skin: बीटरुटचा वापर करून चेहऱ्यावर इतका छान ग्लो येईल की आरशात स्वत:कडे तुम्ही पाहातच राहाल...(how to get instant glowing skin?)

बऱ्याचदा असं होतं की रोजच्या धावपळीत त्वचेकडे पुरेसं लक्ष देणं होतच नाही. त्यामुळे मग डेडस्किन, टॅनिंग वाढत जातं. चेहरा काळवंडल्यासारखा होतो. असं काही झालं तर लगेचच पार्लरमध्ये जाऊन महागडं फेशियल करण्याची गरज नसते. त्याउलट घरच्याघरीच तुम्ही असे काही उपाय करू शकता की जेणेकरून तुम्हाला त्वचेमध्ये खूप छान बदल झालेला दिसेल. अशाच काही घरगुती उपायांपैकी एक असणारा बीटचा उपाय आपण पाहूया (Beet Root Face Mask for Glowing Skin).. हा उपाय करण्यासाठी सगळे घरातलेच पदार्थ लागणार आहेत.(how to get instant glowing skin?)

 

ग्लोईंग स्किनसाठी बीट रुटचा फेसमास्क

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी तर एक बीट घ्या आणि ते थोडं किसा. त्यानंतर बीटचा किस एका सुती कपड्यात गुंडाळा आणि त्याचा रस एका वाटीत काढून घ्या.

लग्नाच्या पंगतीतला चमचमीत मसालेभात आवडतो? घ्या रेसिपी, घरीच करा अस्सल चवीचा खमंग बेत

बीटचा रस जेवढा असेल तेवढीच त्यात कॉफी पावडर घाला. सगळं मिश्रण एकदा हलवून घ्या आणि नंतर हा लेप चेहऱ्याला लावा. त्यानंतर ५ ते ६ मिनिटांनी हलक्या हाताने चोळून लेप काढून टाका.

 

आता एका वाटीत पुन्हा थोडा बीटचा रस घ्या. त्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ आणि थोडं बेसन घाला. तिन्ही पदार्थ कालवून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.

सतत माकड हाड दुखतं, बसणं-उठणं झालं अवघड? ३ सोपे व्यायाम करा-दुखणं होईल कमी

१० मिनिटांनी लेप सुकत आल्यानंतर हलक्या हाताने चोळून लेप काढून टाका. त्यानंतर चेहरा धुवून घ्या आणि मॉईश्चराईज करा. बघा त्वचेमध्ये तुम्हाला खूप छान बदल दिसून येईल.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Beetroot for glowing skin: Two-step home remedy for radiant skin.

Web Summary : Struggling with dull skin? Skip expensive facials! This simple beetroot face mask, with coffee, wheat flour, and gram flour, revitalizes your skin, leaving it glowing and refreshed. Try this easy, at-home remedy today!
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी