आपली त्वचा सुंदर, नितळ आणि स्वच्छ असावी असं प्रत्येकाला वाटतं.(skin care tips) वय वाढू लागलं की, त्वचेवर पिंपल्स, डाग, सुरकुत्या दिसू लागतात.(Natural skin glow remedy) त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य हरवत जाते. आपलाही चेहरा मऊ आणि चमकदार असावा असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. त्यासाठी ती चेहऱ्यावर सतत काहींना काही लावत असतं. अनेक घरगुती उपाय किंवा महागड्या क्रीम्सचा वापर देखील करते.(Clear skin home remedy) परंतु, यामुळे त्वचा सुंदर होण्याऐवजी अधिक खराब होते. पिंपल्स कमी होण्याऐवजी ते अधिक वाढतात.(Skincare without facial) अनेक महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी महागडे फेशियल किंवा क्रीम्स त्वचेवर लावतात.ज्याचा परिणाम त्वचेवर उलटा होतो.(Glowing skin tips) पण आठवडाभर एक खास उपाय केला तर त्वचा चमकण्यास मदत होईल आणि डाग देखील जातील. जाणून घेऊया त्वचेची काळजी घेण्यासाठी काय करायला हवं.
कोरड्या-खराट्यासारख्या केसांवर जादू करेल 'हा' हेअर मास्क, केस होतील मऊ, सुळसुळीत आणि काळेभोर
बीट आपल्या आरोग्यासाठी जितके फायदेशीर आहे तितकेच त्वचेसाठी देखील आहे. त्यासाठी आपल्याला बीटाच्या रसाला बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवावा लागेल. रोज सकाळ संध्याकाळ हा क्यूब चेहऱ्यावर घासा. असं आठवडाभर केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक दिसून येईल.
बीट आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. यात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतात. हे त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास आणि रंगद्रव्य कमी करण्यास मदत करते. इतकेच नाही मुरुमांपासून देखील आपला बचाव करते. बीट रोज खाल्ल्याने रक्त स्वच्छ होते. तसेच त्वचेला आतून हायड्रेशन मिळते.
त्वचेला आइस फेशियल केल्याने फायदा होतो. त्वचेवरील सूज आणि जळजळ कमी होते. यामुळे त्वचेचा लालसरपणा आणि मुरुमांच्या वेदना देखील कमी होतात. बर्फामुळे त्वचा घट्ट होण्यास मदत होते. तसेच त्वचा मऊ, गुळगुळीत दिसू लागते आणि त्वचेवरील अतिरिक्त तेलही कमी होते. आइस फेशियलमुळे डोळ्यांची सूज आणि काळी वर्तुळे कमी होतात. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. तसेच डोळ्यांभोवती सुरकुत्या आणि बारीक रेषा असतील तर त्या देखील कमी होतात.