बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता चंकी पांडे यांची लेक अनन्या पांडे देखील तितकीच लोकप्रिय आहे. बॉलीवूडमधील तरुण आणि टॅलेंटेड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या ग्लोइंग आणि फ्लॉलेस स्किनसाठी खूपच फेमस आहे. रेड कार्पेट असो वा कॅज्युअल लूक, तिच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक स्किन ग्लो नेहमीच लक्ष वेधून घेतो. आजच्या (How to get flawless glowing skin like ananya panday at home naturally) पिढीतील तरुणींमध्ये अनन्या पांडेची स्टाईल आणि ब्युटी खूप पॉप्युलर आहे. अनेक तरुणींना तिच्यासारखी त्वचा हवी असते, पण त्यासाठी ती नेमकं काय करते, हे अनेकांना माहित नसतं. अनन्या कोणत्याही (Ananya Panday natural beauty tips) मोठ्या कार्यक्रमासाठी किंवा शूटिंगसाठी नेहमीच फ्रेश आणि सुंदर दिसते. तिच्या या सौंदर्याचे खरे सिक्रेट महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स नसून, एक साधेसुधे स्किन केअर रुटीन आहे( how to get glowing skin like Ananya Panday).
अनन्या कायमच आपली त्वचा सुंदर आणि ग्लोइंग दिसण्यासाठी तिचे नेहमीचे स्किन केअर रुटीन फॉलो करतेच. ग्लॅमर वर्ल्डमध्ये काम करताना सतत मेकअप करावा लागतो, पण त्याचा चेहऱ्यावर परिणाम होऊ नये म्हणून अनन्या एक खास स्किनकेअर रूटीन फॉलो करते. तिच्या या सिक्रेट्समुळे तिची स्किन नेहमीच हेल्दी, ग्लोइंग आणि नॅचरल दिसते. तिची ग्लोइंग स्किन आणि निखळ सौंदर्य तिच्या फॅन्सना भुरळ पाडते, त्यामागे आहे तिचं सातत्यपूर्ण स्किनकेअर रूटीन ज्यामुळे ( Ananya Panday skincare routine) तिचा चेहरा नेहमी तजेलदार दिसतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी अनन्या दिवसातून किमान ३ ते ४ वेळा एक गोष्ट आवर्जून करतेच, ते नेमकं काय आहे ते पाहूयात.
स्किन केअरसाठी अनन्या पांडे दिवसातून अनेकदा करते एक खास गोष्ट...
१. अनन्या पांडे तिच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी दररोज दिवसातून किमान ३ वेळा चेहऱ्यावर गुलाब पाणी शिंपडते. आपल्या घरात सहज उपलब्ध असलेले हे गुलाब पाणी अनन्याच्या चमकदार त्वचेचे एक खास सिक्रेट आहे. गुलाब पाणी त्वचेला हायड्रेट ठेवते आणि आवश्यक पोषक तत्वे पुरवते.
सणउत्सवाचे दिवस आणि मेकअप प्रॉडक्ट्स सुकून खडखडीत झाले? ७ टिप्स- एका मिनिटांत वापरा तेच नव्यासारखे..
२. अनन्या पांडेने सांगितले आहे की ती तिच्या दिवसाची सुरुवात सकाळी उठल्यावर गरम पाणी पिऊन करते. यामुळे तिची त्वचा स्वच्छ, हायड्रेटेड आणि चमकदार राहते. त्याचबरोबर, गरम किंवा कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात, ज्यामुळे त्वचेला फायदा होतो.
ऐन तारुण्यात त्वचा लूज पडली, सुरकुत्या वाढल्या? 'असा ' करा स्किन टाईट करणारा घरगुती मास्क...
३. पाणी प्यायल्यानंतर अनन्या पांडे पाण्याने चेहरा स्वच्छ धुते. यामुळे रात्री जमा झालेली घाण आणि तेल निघून जाते, तसेच त्वचा ताजीतवानी वाटते. यामुळे चेहऱ्यावर चमक येते, पोर्स स्वच्छ होतात आणि मुरुमांसारख्या समस्यांपासून बचाव होतो.
४. अनन्या तिच्या चेहऱ्यावर सनस्क्रीन नक्की लावते. यामुळे त्वचेचे हानिकारक अतिनील (UV) किरणांपासून संरक्षण होते. परिणामी, टॅनिंग, सुरकुत्या आणि त्वचेच्या इतर समस्या होत नाहीत. यामुळे त्वचा अकाली वृद्ध दिसत नाही.