Join us

लग्न जवळ आलंय पण त्वचेवर तेजच नाही? सोपा उपाय-१५ दिवसांत दिसेल फरक, चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2025 09:30 IST

bridal glow tips: pre wedding skincare routine: how to get glowing skin before wedding: लग्नाच्या १५ दिवसाआधी आपण काही खास काळजी घेतल्यास त्वचा ग्लो होण्यास मदत होईल.

लग्नाचा दिवस म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला सगळ्यात खास आणि अविस्मरणीय दिवस. त्या दिवशी सर्वाचं लक्ष असतं ते नवरीकडे तिच्या पोशाखावर, दागिन्यांवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावर आलेला ग्लो. दिवाळीत तुळशी विवाहानंतर अनेकांच्या लग्नाची तारीख असते.(bridal glow tips) लग्न म्हटलं की मुलींची नुसतं धांदल. सध्या लग्न समांरभाचे विविध कार्यक्रम आखले जातात. हे किमान ४ ते ५ दिवस असतात.(pre wedding skincare routine) रोजचा पेहराव, त्यावर साजेशी ज्वेलरी, मेकअप, हेअर स्टाइल असं सारं काही ठरवलेलं असतं. (how to get glowing skin before wedding)पण लग्नात स्पेशल दिसायचं असेल तर फक्त कपडे, दागिने, मेकअप एवढ्यावर गोष्टी भागत नाही.(bridal beauty secrets) तर त्वचेची देखील काळजी आपल्याला घ्यावी लागते.(skin glow home remedies) लग्नाआधी मुलींनी त्वचेची काळजी कशी घ्यावी? त्वचेवर तेज आणण्यासाठी काय करावं? कोणत्या चुका टाळायला हव्या जाणून घेऊया. 

कुठल्याही साडी-ड्रेसवर शोभून दिसणारी चेन- पाहा ७ सुंदर डिझाईन्स, ऑफिस असो की पार्टी सगळ्यांवर दिसेल सुंदर

प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ श्वेता शाह म्हणतात की ब्रायडल लूकसाठी मुली १८ ते २० हजार रुपये घालवतात पण काही केल्या त्यांच्या चेहऱ्यावर ग्लो येत नाही. पण लग्नाच्या १५ दिवसाआधी आपण काही खास काळजी घेतल्यास त्वचा ग्लो होण्यास मदत होईल. 

त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला २ चमचे तांदळाचे पाणी,  १ चमचा कोरफडीचा गर आणि २ चमचे व्हिटॅमिन ई तेल घ्यावे लागेल. यानंतर आपल्याला हे सर्व एकत्र करुन त्याची गुळगुळीत जेल बनवा. काचेच्या बाटलीत भरा. रात्री तोंड धुतल्यानंतर २ थेंब चेहऱ्यावर लावा. हलक्या हातांनी त्वचेची मालिश करा आणि रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी आपली त्वचा मऊ, चमकदार होईल. तसेच त्वचेवरील बारीक सुरकुत्या, टॅन देखील कमी होईल. आपल्याला हे १५ दिवस नियमितपणे करायचे आहे. 

तांदळाचे पाणी त्वचेसाठी नैसर्गिक टोनर म्हणून काम करते. यात  व्हिटॅमिन बी, सी आणि ई असते. जे त्वचेला पोषण देते. यामुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो. कोरफडीचा गर थंड असल्यामुळे त्वचेसाठी चांगला आहे. हे आपल्याला त्वचेला आतून हायड्रेट करते आणि त्वचा कोरडी राखण्यास मदत करते. यात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे मुरुमे, जळजळ कमी करतात. व्हिटॅमिन ई कॅप्सूल हे अँटिऑक्सिडेंट आहे. जे त्वचेच्या पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bridal glow before wedding: Simple 15-day skin care remedy.

Web Summary : Want a bridal glow? Nutritionist Shweta Shah suggests a simple 15-day skincare routine using rice water, aloe vera, and vitamin E oil for radiant skin.
टॅग्स :शुभविवाहब्यूटी टिप्सत्वचेची काळजी